थेट घड्याळावरून करा फोन, या कंपनीने लाँच केली ४जी सिमसह येणारी स्मार्ट वॉच

नवी दिल्ली : टीसीएलने आपली नवीन स्मार्टवॉच ला लाँच केले आहे. गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या मूवटाइम फॅमिली वॉचचे हे अपग्रेडेड व्हर्जन आहे. नवीन वॉचमध्ये मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त जीपीएस ट्रॅकर, कॅमेरा आणि मोठी बॅटरी मिळेल. Movetime Family Watch 2 मध्ये ४जी सिमचा सपोर्ट देखील मिळेल. याच्या मदतीने तुम्ही फोन करू शकता व मेसेज देखील पाठवू शकता. वाचाः TCL Movetime Family Watch 2 ची किंमत TCL Movetime Family Watch 2 ची किंमत १४९ यूरो (जवळपास १३,२०० रुपये) आहे. या स्मार्ट वॉचची विक्री ऑगस्टपासून यूरोपमध्ये सुरू होईल. मात्र विक्रीची तारीख सांगण्यात आलेली नाही. भारतात ही कधी लाँच होईल याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही. वाचाः TCL Movetime Family Watch 2 चे स्पेसिफिकेशन TCL Movetime Family Watch 2 मध्ये १.५४ इंचाचा कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. यात मिळतो. लहान मुलं होम स्क्रीनवर कलरफूल वॉलपेपर ठेवू शकतात. यात ४जीचा सपोर्ट देण्यात आला असून, याच्या मदतीने व्हिडीओ कॉलिंग, कॉलिंग आणि मेसेजची सुविधा मिळेल. यात नॅनो सिम कार्ड सपोर्ट मिळेल. इमर्जेंसीसाठी SoS बटन देखील आहे. TCL Movetime Family Watch 2 मध्ये रियल टाइम जियोलोकेशन आहे. यात लोकेशनच्या संपूर्ण हिस्ट्रीचा देखील लॉग बनतो. या वॉचची बॅटरी आधीच्या वॉचच्या तुलनेत ४० टक्के अधिक आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35QRHPo

Comments

clue frame