बाजारात नवी फसवणूक...व्हॉट्सअॅप हॅक करून लूट, मुंबईत धक्कादायक प्रकार उघडकीस

म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : सायबर भामटे लोकांच्या फसवणुकीसाठी नवनवीन मार्गांचा अवलंब करीत असून, आता त्यांनी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप माध्यमाचा वापर सुरू केला आहे. एखाद्या व्यक्तीचे व्हॉटसॲप हॅक करून त्या व्यक्तीच्या परिचयातील व्यक्तीशी चॅटिंग केले जाते. आपल्या ओळखीची व्यक्ती असल्याचे समजून कुणीही या भामट्यांच्या जाळ्यात अडकले की, पैशाची मागणी करून त्यांना फसविले जाते. वाचाः माटुंगा येथे राहणाऱ्या सीमाराणी यांच्या मोबाइलवर २० जून रोजी प्रसाद या मित्राचा व्हॉट्सॲप संदेश आला. यामध्ये प्रसाद याने पैशाची गरज असून तुझ्याकडे डेबिट कार्ड आहे का, अशी सीमाराणी यांना विनंती केली. लहानपणापासून मित्र असल्याने सीमाराणी यांनी हो उत्तर देतानाच त्याच्या मागणीनुसार कार्डचा फोटो व्हॉट्सॲपवर पाठवला. सीमाराणी यांच्या खात्यातील पैसे मुदत ठेवीच्या स्वरूपात असल्याने ते बँक खात्यामध्ये येत नव्हते. त्यानंतर हे पैसे बँकेकडून यूपीआय आयडी घेऊन सीमाराणी यांनी बँक खात्यावर वळते केले. त्यानंतर प्रसाद याने दोन वेळा प्रत्येकी ५० हजार रु. असे एक लाख रु.चे व्यवहार केले. पैसे वजा झाल्याचे संदेश सीमाराणी यांच्या मोबाइलवर आले. आपल्याला दोन लाख रुपये हवे असल्याचे प्रसाद याने व्हॉट्सॲपवर संदेश पाठवून सांगितले. इतके पैसे नसल्याने सीमाराणी यांनी दुसऱ्या मित्रांकडून पैसे घेतले आणि बँक खात्यात ट्रान्स्फर केले. त्यानंतर प्रसाद याने आणखी ९९ हजार रुपये काढले. पैसे मिळाले का, हे विचारण्यासाठी सीमाराणी यांनी प्रसादला फोन केला, त्यावेळी त्याने आपण पैसे मागितलेच नसल्याचे सांगितले. वाचाः अॅक्टिव्हेशन कोड देऊ नका सीमाराणी यांना व्हॉट्सॲपवर संदेश पाठविण्याच्या आधी प्रसाद याला अनोळखी क्रमांकावरून एक फोन आला होता. त्या व्यक्तीने प्रसाद याला बोलण्यात गुंतवून वेगवेगळी कारणे देत त्याच्याकडून व्हॉट्सॲपचा ॲक्टिव्हेशन कोड घेतला होता. त्याद्वारे त्या व्यक्तीने प्रसादच्या क्रमांकावर व्हॉट्सॲप सुरू करून सीमाराणी यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्याकडून १ लाख ९९ हजार रुपये उकळले. सीमाराणी यांनी याप्रकरणी माटुंगा पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hfzYXb

Comments

clue frame