सावधान! सोशल मीडियावर करता ‘हे’ काम, २४ तासात डिलीट होईल तुमचे अकाउंट

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची संख्या प्रचंड वाढली. यासोबतच स्मार्टफोन वापरणारी व्यक्ती सोशल मीडिया नाही, असे क्वचितच पाहायला मिळते. , आणि सारख्या अ‍ॅप्सचा वापर यात सर्वाधिक आहे. या प्लॅटफॉर्म्सवर फेक अकाउंट्सची संख्या देखील वाढत चालली आहे. अशात नवीन आयटी नियमांतर्गत यावर तोडगा काढण्याचा विचार करत आहे. सरकारचे म्हणणे आहे की, सोशल मीडिया कंपन्यांना फेक अकाउंट्सला डिलीट करावे लागेल व यासाठी २४ तासांचा कालावधी असेल. वाचाः सोशल मीडियासाठी नवीन नियम: जर एखादी व्यक्ती सेलिब्रेटी जसे की खेळाडू, कलाकार, नेता इत्यादींचे फेक प्रोफाइल बनवून त्यांच्या फोटोज आणि स्टोरीचा वापर करून फॉलोवर्स वाढवत असेल तर असे अकाउंट २४ तासांच्या आत हटवले जाईल. जर एखाद्या सेलिब्रेटीने त्यांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या फेक अकाउंटबाबत तक्रार केल्यास कंपनी ते अकाउंट हटवेल. वाचाः फॅन पेज अकाउंटचे काय होणार ? या नियमामुळे प्रश्न उपस्थित होतो की, Facebook ,Instagram आणि Twitter वर चालवल्या जाणाऱ्या अशा अकाउंट्सचे काय होणार ? कारण हे फॅन पेज देखील सेलिब्रेटींचे फोजो, पोस्ट आणि स्टोरीचा वापर करतात व त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. जर एखाद्या सेलिब्रेटीने फॅन पेजबाबत सोशल मीडिया फर्मला तक्रार केल्यास, कंपनीला त्वरित कारवाई करावी लागेल. यानंतर २४ तासांच्या आत अकाउंट हटवले जाईल. जर तुमचे अकाउंट सुद्धा हटवले जाऊ नये असे वाटत असेल तर सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करायला हवा. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zUdOCl

Comments

clue frame