नवी दिल्लीः जर तुमचा मुलगा ऑनलाइन गेम खेळत असेल तर तुम्हाला अलर्ट राहणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन गेमिंगच्या चक्करमध्ये बँक अकाउंटमधून पैसे जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. छत्तीसगडमधील कांकेर येथे अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेच्या बँक अकाउंटमधून ऑनलाइन गेमिंगसाठी जवळपास सव्वा तीन लाख रुपये कट झाले आहेत. या महिलेच्या १२ वर्षीय मुलाने गेमच्या अपडेट्स साठी हे पैसे खर्च केले आहेत. वाचाः पैसे कट झाल्याचा मेसेज आला नाही कांकेर मध्ये ही महिला ज्यावेळी पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये पोहोचली त्यावेळी तिच्या अकाउंटमध्ये फक्त ९ रुपये बॅलेन्स होते. हे पाहून महिलेला जबर धक्का बसला. त्यानंतर या महिलेने पोलीस ठाण्यात जावून ऑनलाइन फ्रॉडची तक्रार नोंदवली. परंतु, महिलेने सांगितले की, पैसे कट झाल्याचा कोणताही मेसेज फोनवर आला नाही. तसेच कोणताही ओटीपी सुद्धा आला नाही. वाचाः २७८ ट्रान्झॅक्शनमधून काढले ३ लाख २२ हजार रुपये पोलीस तपासातून ही माहिती समोर आली आहे की, ८ मार्च ते १० जून या दरम्यान या महिलेच्या खात्यातून २७८ वेळा ट्रान्झॅक्शन करण्यात आले. यातून ३ लाख २२ हजार रुपये काढण्यात आले आहे. गेम खेळण्यासाठी आणि गेमच्या लेवलला अपग्रेड करण्यासाठी या पैशाचा वापर करण्यात आल्याचे तपासात समजले. वाचाः गेमची सवय महिलेच्या १२ वर्षीय मुलाला याविषयी विचारले असता, त्याने सांगितले की, त्याला ऑनलाइन गेम फ्री फायरची सवय होती. गेम मध्ये शस्त्र खरेदी करण्यासाठी त्याने आईच्या मोबाइल नंबरला बँक अकाउंटसोबत लिंक करून ट्रान्झॅक्शन केले. वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jgHCDn
Comments
Post a Comment