आता चक्क फोन स्क्रीनच्या मदतीने कोरोना चाचणी शक्य, या देशाच्या वैज्ञानिकांनी शोधली खास पद्धत

नवी दिल्ली : जगभरात महामारीचे संकट अद्यापही कायम आहे. या संकटामुळे आतापर्यंत लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागल आहेत. मात्र, आता वैज्ञानिकांनी चाचणीसाठी एक मोठा शोध लावला आहे. हे इनोव्हेशन तुम्हाला देखील हैराण करेल. वैज्ञानिकांनी कमी खर्चात अशा प्रक्रियेचा शोध लावला आहे, ज्याद्वारे स्मार्टफोनच्या स्क्रीनवरून जमा करण्यात आलेले नमुन्यांची चाचणी करून कोणतीही चूक न करता व वेगाने चा शोध लावता येईल. वाचाः फोनच्या स्क्रीनने होईल स्वॅबची चाचणी ब्रिटनच्या यूनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या (यूसीएल) संशोधकांनी (PoST) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्धतीचा उपयोग करत, लोकांऐवजी आत मोबाइल फोन स्क्रीनवरून जमा केलेल्या स्वॅबची चाचणी करण्याची पद्धत शोधली आहे. त्यांना आढळले की, ज्या लोकांची नियमित पीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यांचे सँपल स्मार्टफोनवरून जमा केल्यानंतर देखील पॉझिटिव्ह आढळले. अँटिजन टेस्टप्रमाणेच अचूक नवीन तंत्रज्ञाना जर्नल ईलाइफमधील रिपोर्टनुसार, या तंत्रज्ञानाला ८१ ते १०० टक्के संक्रमित लोकांच्या मोबाइल फोनवर कोरोना व्हायरस आढळला आहे. याचा अर्थ हे अँटिजन टेस्ट प्रमाणेच अचूक आहे. वाचाः कोरोना ओळखण्यास मदत संशोधकांनुसार, साठी जागतिक स्तरावर अॅक्टिव्ह स्क्रिनला प्राथमिकता आहे. कारण नवीन व्हेरिएंट समोर येत आहे. अनेक देशात लसीकरणाची देखील गॅरेंटी नाही. PCR च्या तुलनेत कमी खर्चिक
  • संशोधकांनुसार, टेस्टिंग महागडी आणि शारीरिक दृष्टीने अयोग्य असू शकते. जे दोन्ही इफेक्टिव्ह टेस्ट आणि ट्रेस सिस्टमसाठी मोठे अडथळे आहे.
  • संशोधकांनुसार, फोन स्क्रीन टेस्टिंग (PoST) क्लिनिकल टेस्टऐवजी पर्यावरणीय चाचणी आहे. त्यामुळे स्वॅब पीसीआर चाचणीच्या तुलनेत हे कमी खर्चिक आहे.
कमी उत्पन्न असणाऱ्या देशांसाठी उपयोगी हे गरीब देशांसाठी उपयुक्त तर आहेच, सोबतच कोविड-१९ टेस्टिंग वाढवण्यासाठी देखील उपयोगी ठरेल. याद्वारे सामान्य लोकसंख्या असलेल्या भागात नियमित टेस्टिंगमध्ये याद्वारे वाढ करता येऊ शकते, असेही संशोधकांनी सांगितले. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gQOGVE

Comments

clue frame