अँड्राइड आणि आयफोनमध्ये ‘या’ १० अ‍ॅप्सचा बोलबोला, पाहा कोण आहे डाउनलोडिंगमध्ये अव्वल

नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर प्रचंड वाढला आहे. Sensor Tower ने २०२१ च्या पहिल्या सहामाहीत आणि वरील सर्वाधिक लोकप्रिय १० अ‍ॅप्सची यादी जारी केली आहे. या अ‍ॅप्सला अँड्राइड आणि आयओएस फोनमध्ये सर्वाधिक वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. काही अ‍ॅप्स दोन्ही प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय आहेत, तर काही अ‍ॅप्स एकाच प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय आहेत. या यादीत गुगल आणि फेसबुकच्या मालकीच्या अ‍ॅप्सचा दबदबा पाहायला मिळतो. २०२१ च्या पहिल्या सहामाहीत यूजर्सने कोणत्या अ‍ॅप्सला पसंती दिली आहे, ते जाणून घेऊया. वाचाः TikTok: टिकटॉकने टॉप-१० अ‍ॅप्सच्या यादीत सर्वाधिक डाउनलोडिंगमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. आयओएसमध्ये या अ‍ॅपला सर्वाधिक डाउनलोड करण्यात आले तर अँड्राइडमध्ये डाउनलोडिंगच्या बाबतीत हे अ‍ॅप दुसऱ्या स्थानावर आहे. Facebook: या सोशल मीडिया अ‍ॅपला गुगल प्ले स्टोरवरून सर्वाधिक वेळा डाउनलोड करण्यात आले. तर अ‍ॅपल प्ले स्टोवर हे अ‍ॅप सहाव्या क्रमाकावर आहे. Instagram: फेसबुकच्या मालकीचे फोटो शेअरिंग अ‍ॅप हे आणि अ‍ॅपल प्ले स्टोर दोन्ही ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर आहे. WhatsApp: फेसबुकचे इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल प्ले स्टोर दोन्ही ठिकाणी चौथ्या नंबरवर आहे. Messenger: फेसबुकच्या या अ‍ॅपने टॉप-१० अ‍ॅप्सच्या यादीत स्थान मिळवले. गुगल प्ले स्टोरवर हे अ‍ॅप सहाव्या, तर अ‍ॅपल प्ले स्टोरवर सातव्या क्रमांकावर आहे. वाचाः Zoom: कोरोना महामारीच्या संकटात हे व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग अ‍ॅप देखील लोकप्रिय झाले. Apple App Store वर हे अ‍ॅप पाचव्या आणि गुगल प्ले स्टोरवर आठव्या क्रमांकावर आहे. Gmail: Apple App Store वर गुगलची ईमेल सर्व्हिस १०व्या क्रमांकावर आहे. तर गुगल प्ले स्टोरमध्ये टॉप-१० सर्वाधिक डाउनलोडिंग अ‍ॅपच्या यादीत स्थान मिळाले नाही. YouTube: गुगलच्या व्हिडीओ स्ट्रिमिंग App ने Apple App Store वर दुसरे स्थान मिळवले आहे. तर गुगल प्ले स्टोरवर टॉप-१० मध्ये स्थान मिळवू शकले नाही. Snapchat: गुगल प्ले स्टोरवर डाउनलोडिंगमध्ये हे अ‍ॅप सातव्या स्थानावर आहे. तर Apple App Store वर टॉप-१० मध्ये स्थान मिळाले नाही. Google Maps: अ‍ॅपल प्ले स्टोरवर हे लोकप्रिय अ‍ॅप डाउनलोडिंगच्या बाबतीत ९व्या स्थानावर आहे. तर Google अ‍ॅप स्टोरमध्ये टॉप-१० मध्ये स्थान मिळवू शकले नाही. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qyPb9X

Comments

clue frame