मुंबईः कोविड १९ संदर्भातील मदतकार्याला साह्य आणि चालना देण्याच्या आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून या भारतातील एतद्देशीय ई-कॉमर्स कंपनीने महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमआयडीसी)ला ३० जीवनरक्षक आयसीयू व्हेंटिलेटर्स दिले आहेत. यामुळे गरजू रुग्णांना आवश्यक सेवा पुरवणे राज्यातील आरोग्य यंत्रणेला शक्य होणार आहे. फ्लिपकार्टच्या व्यापक मदतकार्याचा हा एक भाग आहे. या माध्यमातून कंपनी आयसीयू व्हेंटिलेटर्स दान करणार आहे आणि विविध राज्य सरकारांना कोविड-१९ रुग्णांना उपचार देणे आणि वेळेत अत्यावश्यक सेवा पुरवण्यात साह्य लाभणार आहे. वाचाः महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले, महाराष्ट्र आणि देशभरात विविध उपक्रम हाती घेऊन फ्लिपकार्टने कोविड-१९ विरोधी लढ्यात अथक प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आपण कोविड-१९ शी लढत असताना राज्याला केलेले हे सहकार्य आणि आपल्या अत्यावश्यक सेवेला बळकटी दिल्याबद्दल मी फ्लिपकार्टचे आभार मानतो. या आयसीयू व्हेंटिलेटर्समुळे राज्यातील आरोग्य सेवेला मदत होईल आणि गरजूंना अत्यावश्यक सेवा पुरवण्याचा आपण प्रयत्न करत असताना यामुळे आवश्यक लवचिकताही मिळेल. वाचाः फ्लिपकार्टचे चीफ कॉर्पोरेट अफेअर्स ऑफिसर रजनीश कुमार म्हणाले, कोविड-१९ विरोधातील लढा फार मोठा आहे. यात प्रत्येकानेच सहकार्य करायला हवे. या आव्हानात्मक काळात समाजाची सेवा करणे हा आमचा सन्मान आहे. सुयोग्य उपकरणांसह आरोग्य यंत्रणेला बळकटी देणे ही काळाची गरज आहे आणि या सुविधा उपलब्ध करून देण्यास विविध भागधारक आणि राज्य सरकारांसोबत काम करण्यास फ्लिपकार्ट बांधिल आहे. आम्हाला आशा आहे की या आयसीयू व्हेंटिलेटर्ससह अत्यावश्यक वैद्यकीय सेवेला बळकटी मिळेल आणि कोविड विरोधातील सरकारच्या प्रयत्नांना पाठबळ मिळेल. वाचाः मागील १५ महिन्यांच्या या जागतिक संकटाच्या काळात फ्लिपकार्टने देशभरातील राज्य सरकारे आणि स्थानिक प्रशासनाला साह्य करण्याची आपली बांधिलकी जपली आहे. क्रिटिकल मेडिकल केअर, पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट पुरवणे आणि अत्यावश्यक वैद्यकीय सामुग्री आणि ऑक्सिजन सिलेंडर्सच्या डिलिव्हरीसाठी आपल्या पुरवठा साखळीचा वापर यातून फ्लिपकार्ट सातत्याने कोविडविरोधी लढ्यात सहभाग नोंदवत आहे. वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3h345SL
Comments
Post a Comment