नवी दिल्ली : अवकाशात झेप घेण्याचे मानवाचे स्वप्न सुरुवातीपासूनच आहे. आता पर्यटनासाठी देखील स्पर्धा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. उद्योगपती यांच्या या कंपनीला प्रवाशांना अंतराळात रॉकेट प्लेनद्वारे घेऊन जाण्याची अखेर परवानगी मिळाली आहे. अमेरिकेच्या फेडरल अॅव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने ब्रँन्सन यांच्या कंपनीला ही परवानगी दिली आहे. वाचाः रिचर्ज ब्रँन्सन यांच्याकडे रॉकेटद्वारे अंतराळाची सैर करण्यासाठी प्रतिक्षा करणाऱ्या ६०० लोकांची यादी आहे. रॉकेटद्वारे अवकाशात ९० किमी उंचीवर पर्यटकांना नेले जाईल. यामध्ये अंतराळवीर, कलाकारांचा समावेश आहे व यासाठी त्यांनी आधीच पैसे दिले आहेत. Virgin Galactic कंपनीचे रॉकेट अमेरिकेच्या न्यू मॅक्सिको वाळवंटातून या प्रवाशांना घेऊन उड्डाण घेईल. यासाठी कंपनी गेल्या महिन्यात २२ मे ला चाचणी देखील केली होती. त्यानंतर आता फेडरल अॅव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनकडून परवानगी मिळाली आहे. यासंदर्भात बोलताना कंपनीचे सीईओ Michael Colglazier म्हणाले की, आम्ही आमच्या चाचणीच्या रिझल्टद्वारे खूष आहोत व आम्हाला आमच्या उद्दिष्टांप्रमाणेच रिझल्ट मिळाला. या उन्हाळ्यात क्रू फ्लाइटची टेस्ट केली जाणार असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. वाचाः Virgin Galactic कंपनी लवकरच आपली कमर्शियल सर्व्हिस सुरू करणार आहे. सर रिचर्ड स्वतः रॉकेटद्वारे अवकाशात जाऊ शकतात. याद्वारे कंपनीची उत्पादन मिळवण्याची योजना आहे. तसेच, ने एक मिशन बूक केले आहे. सर रिचर्ड हे ४ जुलैला उड्डाण घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, या शक्यताच असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. अद्याप उड्डाणाची तारीख निश्चित झालेली नाही. चे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या आधी त्यांना अंतराळवीराचे क्रेडिंशियल मिळू शकते. जेफ बेझॉस यांची २० जुलैला अंतराळात जाण्याची योजना आहे. दरम्यान, सर रिचर्ड ब्रँन्सन यांनी २००४ मध्ये सर्वात प्रथम रॉकेटद्वारे प्रवाशांना अंतराळात घेऊन जाण्याची योजना बोलून दाखवली होती व यासाठी २००७ चे लक्ष समोर ठेवले होते. मात्र, यासाठी अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागला. वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jiW91d
Comments
Post a Comment