गुगल २०२३ मध्ये बंद करणार ‘ही’ सर्व्हिस, होत आहे जोरदार विरोध

नवी दिल्ली : दिग्गज टेक कंपनी गुगलने मोठा निर्णय घेतला आहे. गुगलने जानेवारी २०२२ पर्यंत काढून टाकणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता कंपनीने ही मुदत वाढवून वर्ष २०२३ केली आहे. गुगलने २०२३ नंतर ही टेक्नोलॉजी हटवणार असल्याचे म्हटले आहे. यावरून आता विरोध होताना पाहायला मिळत आहे. वाचाः क्रोम वेब ब्राउजर टेक्नोलॉजीच्या मदतीने अ‍ॅड ट्रॅकिंग केले जाते. यावरून यूजर काय सर्च करत आहे, याची माहिती कंपनीला मिळते. याचाच विरोध इतर कंपन्या करत आहेत. कंपनीला नवीन टेक्नोलॉजी आणण्यासाठी आता अधिक दिवस लागणार आहेत. वाचाः नवीन टेक्नोलॉजी आणण्यास लागणार वेळ गुगलचे म्हणणे आहे की, नवीन टेक्नोलॉजी आणण्यासाठी असलेला कालावधी वाढवत आहे. क्रोमचे प्रायव्हसी इंजिनिअरिंगचे डायरेक्टर विनय गोयलचे म्हणणे आहे की, हे जबाबदारीचे काम आहे. यामुळे आम्हाला अधिक वेळ हवा आहे. नवीन टेक्नोलॉजीच्या निर्मितीसाठी गुगल सर्व पब्लिशर्स आणि जाहिरात एजेंसीचा सल्ला घेणार आहे. गुगलच्या टेक्नोलॉजीला विरोध गुगलच्या जाहिरात ट्रॅकिंगला जोरदार विरोध होत आहे. आणि ब्रिटनमध्ये या अ‍ॅड ट्रॅकिंग टेक्नोलॉजीविरोधात आवाज उठवला जात आहे. यावर गुगलने आश्वासन देत म्हटले आहे की, अ‍ॅड ट्रॅकिंग टेक्नोलॉजीवर नव्याने काम केले जाईल व जसे असायला हवे तसेच याची निर्मिती होईल. तसेच, अ‍ॅड कंपनी अथवा एजेंसीला कोणत्याही प्रकारे नुकसान होईल, असे काम करणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dgU6XG

Comments

clue frame