लॉकडाऊनमध्ये वजन वाढलंय? काळजी नको, हे Apps करतील मदत

नवी दिल्ली. करोना काळात लॉकडाऊन असल्यामुळे सगळ्यांचीच जीवनशैली बदलली आहे. बाहेर जाता येत नसल्यामुळे उद्यानमंधील व्यायाम वैगरे तर बंदच आहे. अशात अनेकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम झाला आहे. तर, कायम घरीच राहत असल्यामुळे अनेकांचे वजन वाढले आहे. अजूनही बर्‍याच ठिकाणी अद्याप जिम उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत घरीच व्यायाम केलेला बरा. तुम्ही देखील असाच विचार करत असाल तर काही फिटनेस Apps तुमची मदत करतील. पाहा डिटेल्स. वाचा : आपल्याला निरोगी राहण्यासाठी सोपी वर्कआउट्स करायचे असल्यास आपल्यासाठी 5 Minute Yogaअॅप हा एक चांगला पर्याय आहे. त्याची सर्व सत्रे केवळ सोपीच नाहीत तर प्रभावी देखील आहेत. त्यात वेळ सेटिंग वैशिष्ट्य देखील आहे, ज्याद्वारे आपण वेळेनुसार आपले व्यायाम पूर्ण करू शकता. प्रत्येक सत्रात पाच मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो. ही अॅप बनविणारी कंपनी असा दावा करते की, एखाद्याला वजन कमी करायचे असल्यास हे App त्याच्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे. App मधील व्यायाम शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यात मदत करते. तसेच वजन कमी करण्यास आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यात देखील मदत करते. या अ‍ॅपमध्ये १०० हून अधिक वर्कआउट व्हिडिओ आहेत, जे तुम्ही गरजेनुसार पाहू शकता. Daily Yoga या अ‍ॅपमध्ये सोपे योग दिले आहेत. यात नमूद केलेले व्हिडिओ व्यावसायिक योग प्रशिक्षकाने बनवले आहेत. यात आपण आपल्यानुसार वेळ, योग शैली सेट करू शकता.यातील विशेष बाब म्हणजे आपण अ‍ॅप वापरुन इतर लोकांशीही संपर्क साधू शकता. 7 Minutes Workout 7 Minutes Workout अ‍ॅप गूगलला सपोर्ट करते . यात अनेक नवीन वर्कआउटस आहेत. हे अ‍ॅप खूप जलद वर्कआउट प्रदान करतात. जे, सात मिनिटांत पूर्ण होतात. याची सात मिनिटांची कसरत उच्च तीव्रतेच्या सर्किट प्रशिक्षणावर आधारित आहे, जी तुमची फिटनेस सुधारते. हे व्हॉईस मार्गदर्शन क्रीडासह सुसज्ज आहे. Yoga Down Dog या अॅपमध्ये बरेच पूर्व-रेकॉर्ड केलेले व्हिडिओ उपलब्ध आहेत. यात ६० हजार वर्कआउट उपलब्ध आहेत, जे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कस्टमाईज करू शकता. यात योगाचे सहा शिक्षक आहेत. तसेच, आपण त्यात व्हॉईस पर्याय निवडू शकता. वाचा : वाचा : वाचा :


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3h2Za3c

Comments

clue frame