नवी दिल्ली. घरी नवीन फ्रिज किंवा एसी खरेदी करायचा सेल तर अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर बंपर सूट मिळविण्याची संधी तुमच्याकडे आहे. Amazon वर २५ जून पासून हा सेल सुरु झाला असून हा सेल २९ जूनपर्यंत सुरु राहणार आहे. या सेल अंतर्गत वस्तूंची खरेदी करून मोठी बचत ग्राहकांना करता येणार आहे. जाणून घ्या कोणत्या डिव्हाइसवर किती सूट मिळत आहे. वाचा : एअर कंडिशनर: सेलमध्ये नवीन एसी खरेदीवर ४० टक्के सूट देण्यात येत आहे. यात तुम्ही व्होल्टास, एलजी आणि सॅमसंगसह अनेक कंपन्यांचे एसी खरेदी करू शकता. सेल दरम्यान तुम्ही २२, ४९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर स्प्लिट एसी तर, विंडो एसी केवळ १८,३९० रुपयात खरेदी करू शकता. मायक्रोवेव्ह ओव्हन: सेलमध्ये नवीन मायक्रोवेव्ह ओव्हनच्या खरेदीवर ४० टक्के मिळत आहे. यात नो कॉस्ट ईएमआय ऑफर देखील देण्यात येत आहे. सोलो मायक्रोवेव्ह ४,४९९ रुपयांच्या सुरूवातीच्या किंमतीत खरेदी करता येईल. तर, कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह केवळ ७,९३० रुपयात खरेदी करता येईल. डिशवॉशर: अमेझॉन नवीन डिशवॉशर्सच्या खरेदीवर ४५ टक्के सवलत देत आहे. यात नो कॉस्ट ईएमआय ऑफर देखील देण्यात येत आहे. सेलमध्ये बॉश, आयएफबी आणि एलजी सारख्या कंपन्यांचे डिशवॉशर खरेदी करू शकता. विक्री दरम्यान डिशवॉशर १९,९९९ रुपयांच्या सुरूवातीच्या किंमतीत खरेदी करता येईल. रेफ्रिजरेटर: Amazon सेलमध्ये रेफ्रीजरेटरवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. यात नो कॉस्ट ईएमआय देखील समाविष्ट आहे. यात रेफ्रिजरेटर ६,७९० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर खरेदी करता येईल. त्याचबरोबर सेलमध्ये एनर्जी एफिशिएंट रेफ्रिजरेटरची किंमत सेलमध्ये १३,७९० रुपये इतकी आहे. तर, कन्व्हर्टेबल रेफ्रिजरेटरची प्रारंभिक किंमत २२, ४९० रुपये आहे. एक्सचेंज ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास जुन्या रेफ्रिजरेटर्सच्या एक्स्चेंजवर १२,००० रुपयांपर्यंतची बचत करता येईल. या व्यतिरिक्त, दरमहा ६५७ रुपयांच्या किमतीवर नो कॉस्ट ईएमआय पर्यायाचा लाभ देखील ग्राहक घेऊ शकतात. Amazon इंडिया स्मॉल बिझिनेस डे २०२१ सेल सुरू करणार असून हा सेल २ जुलै ते ४ जुलै पर्यंत सुरु राहील. वाचा : वाचा : वाचा :
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xb8MPW
Comments
Post a Comment