Airtel चे दोन प्रसिद्ध रिचार्ज प्लान बदलले, पाहा आता काय बेनिफिट्स मिळणार

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी ही ला टक्कर देण्यासाठी अनेक नवीन प्लान्स आणत आहे. आता कंपनीने आपल्या दोन प्रीपेड प्लान्समध्ये बदल केला आहे. हे प्लान ३४९ रुपये आणि २९९ रुपयांचे आहेत. या प्लान्सला अधिक वैधता आणि जास्त डेटासोबत सादर करण्यात आले आहे. या प्लान्सला एअरटेलच्या अधिकृत साइटवर लाइव्ह करण्यात आले आहे. वाचाः Airtel चा ३४९ रुपयांचा प्लान एअरटेलच्या ३४९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना २८ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा मिळत असे. यूजर्सला एकूण ५६ जीबी डेटा मिळायचा. मात्र, आता या प्रीपेड प्लान्समध्ये यूजर्सला दररोज २.५ जीबी डेटा मिळणार आहे. या प्रकारे यूजर्सला २८ दिवसांसाठी एकूण ७० जीबी डेटा मिळेल. आधीच्या तुलनेत यूजर्सला १४ जीबी अधिक डेटा मिळेल. या प्लानमध्ये इतर सुविधा आधी सारख्याच आहेत. यात अनलिमिटेड कॉलिंगसोबत १०० एसएमएसची सुविधा मिळते. सोबत Amazon Prime चा २८ दिवसांसाठी मोफत अॅक्सेस मिळेल. या व्यतिरिक्त प्रीमियम आणि चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. वाचाः Airtel 299 प्री-पेड प्लान एअरटेलने आपल्या २९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये देखील बदल केला आहे. आधी हा प्लान २८ दिवस वैधतेसह येत असे. आता यात ३० दिवसांची वैधता मिळेल. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. तसेच एकूण ३० जीबी डेटा मिळतो. हा डेटा वापरण्यावर कोणतीही मर्यादा नाही. तसेच, ग्राहकांना १०० एसएमएसची सुविधा देखील मिळते. या व्यतिरिक्त Mobile Edition चे एका महिन्यासाठी मोफत सबस्क्रिप्शन मिळते. फ्री हॅलो ट्यून, Wynk Music, एक वर्षासाठी Shaw Academy कोर्स आणि FASTAG वर १०० रुपये कॅशबॅक मिळतात. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ddPEZK

Comments

clue frame