Airtel ने लाँच केला ‘एवढ्या’ किंमतीचा नवीन स्मार्ट रिचार्ज प्लान, पाहा वैधता

नवी दिल्ली : लोकप्रिय टेलिकॉम कंपनी ने आपल्या ग्राहकांसाठी सेगमेंटमध्ये एक जबरदस्त प्लान्स लाँच केला आहे. एअरटेलच्या १२८ रुपयांचा नवीन प्रीपेड पॅक आणला असून, याची वैधता २८ दिवस आहे. मात्र, एअरटेलच्या १२८ रुपयांच्या स्मार्ट रिचार्जमध्ये यूजर्सला कॉलिंग, एसएमएस आणि डेटासंबंधित कोणतेही फायदे मिळणार नाहीत. जे लोक केवळ वैधतेसाठी प्लान शोधत आहेत, त्यांच्यासाठी हा नवीन प्लान आणण्यात आला आहे. वाचाः एअरटेलच्या १२८ रुपयांच्या प्लानमध्ये वैधता सोडून इतर फायदे मिळत नाही. अशात त्यांना एसटीडी कॉलसाठी २.५ पैसे प्रति सेकंद, लोकल कॉलिंगसाठी एक रुपये प्रति मिनिट, लोकल मेसेसजसाठी प्रति मेसेज एक रुपया आणि नॅशन मेसेजसाठी १.५ रुपये प्रति मेसेजसाठी मोजावे लागतील. सोबत प्रत्येक एमबी डेटासाठी ५० पैसे द्यावे लागतील. वाचाः एअरटेलच्या १२८ रुपयांच्या स्मार्ट रिचार्ज प्लानऐवजी यूजर्स ४९ रुपये आणि ७९ रुपयांचा स्मार्ट प्लान देखील निवडू शकतात. ४९ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सला ३८.५२ रुपये टॉकटाइमसह १०० एमबी डेटा आणि २.५ पैसे प्रति मिनिट लोकल-एसटीडी कॉलिंगची सुविधा मिळेल. तसेच, ७९ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सला १२८ रुपये टॉकटाइम आणि २००एमबी डेटा मिळेल. यात नॅशनल आणि लोकल कॉलिंगसाठी दर मिनिटाला ६० पैसे मोजावे लागतील. एअरटेलने नवीन स्मार्ट रिचार्ज अशा लोकांसाठी आणला आहे, ज्यांच्याकडे अनेक नंबर्स आहेत व केवळ इनकमिंगसाठी नंबर सुरू ठेवत आहे. एअरटेलप्रमाणेच रिलायन्स जिओ आणि व्हीआयसह अन्य कंपन्या देखील अशाच प्रकारचा ऑफर करतात. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35WJRE1

Comments

clue frame