नवी दिल्ली : रिलायन्स जिओने आपल्या स्वस्त जिओफोन नेक्स्टची घोषणा केली आहे. या फोनच्या घोषणेनंतर आता प्रतिस्पर्धी टेलिकॉम कंपनी एअरटेलची यावर प्रतिक्रिया समोर आली असून, रिलायन्स जिओ-गुगलचा अपकमिंग स्वस्त ४जी स्मार्टफोन त्यांच्या उत्पादनावर कोणताही परिणाम करणार नसल्याचे भारती एअरटेलने म्हटले आहे. कारण, २जी यूजर्स सर्वसाधारणपणे ७ हजार रुपयांपेक्षा अधिकच्या स्मार्टफोनमध्ये अपग्रेड करतात व एअरटेलची निवड करत असतात, असे कंपनीने म्हटले आहे. वाचाः भारताची दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या एअरटेलला अपेक्षा आहे की जिओचा हा स्वस्त फोन ग्राहकांना फीचर फोनमधून स्मार्टफोमध्ये अपग्रेड करण्यास प्रोत्साहित करेल. जेणेकरून, एअरटेलला ग्राहकांना जागतिक दर्जाची सेवा देता येईल. याशिवाय देखील ४जी सेवेला प्राधान्य देत आहे व त्यांच्या फीचर फोन्स यूजर्सला ४जी कडे वळण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. एअरटेलने म्हटले आहे की, आमचा अनुभव आहे की एंट्री-लेव्हल डिव्हाइसमधून ग्राहक हे ७ हजार रुपयांपेक्षा अधिकच्या उत्तम स्मार्टफोन्समध्ये अपग्रेड करण्यास प्राधान्य देतात. तसेच, ते एअरटेल ब्रँड आणि नेटवर्कला पसंती दर्शवतात. एअरटेलने पुढे म्हटले आहे की, ग्राहकांना स्वस्त आणि चांगल्या ऑफर्ससह उत्तम दर्जाचे फोन उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी डिव्हाइस उत्पादकांसोबत काम करत राहिल. यामुळे सर्व भागीदारांच्या प्रयत्नांना बळकटी मिळेल. वाचाः रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेरअमन मुकेश अंबानी यांनी स्वस्त ४जी स्मार्टफोनची घोषणा केल्यानंतर एअरटेलचे हे निवेदन आले आहे. तसेच, जिओचा हा फोन १० सप्टेंबरपासून उपलब्ध होणार असून, देशातील २जी डिव्हाइस वापरणाऱ्या ३०० मिलियन यूजर्सला याद्वारे लक्ष्य केले जाणार आहे. वर्षभरापूर्वी मुकेश अंबानी यांनी २जी मोबाइल टेक्नोलॉजीच्या समाप्तीसाठी सरकारला आवाहन केले होते. मात्र, विश्लेषकांनुसार, यामुळे एअरटेल आणि वोडाफोन-आयडियाला मोठा फटका बसू शकतो. त्यांचे जवळपास ३०० मिलियन २जी यूजर्स असून, यामुळे त्यांचे नुकसान होईल. तसेच, एअरेटलने २जी नेटवर्क बंद करण्याची कोणतीही योजना नसल्याचे म्हटले आहे. कंपनीसाठी २जी सर्व्हिसद्वारे येणारे उत्पादन थांबल्यावरच अशाप्रकारचा निर्णय घेतला जाईल. मात्र, सध्यातरी तशा प्रकारची स्थिती नाही. वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2St7jWk
Comments
Post a Comment