4G कनेक्टिव्हीटीसह Alcatelचे 2 स्वस्त स्मार्टफोन लाँच, किंमत १० हजारांपेक्षा कमी, पाहा फीचर्स

नवी दिल्ली. स्मार्टफोन ब्रँड Alcatel ने दोन स्वस्त स्मार्टफोन आणि लॉन्च केले आहेत. Alcatelचे हे दोन्ही स्मार्टफोन ४ जी कनेक्टिव्हिटीसह येत असून ग्राहकांना आता ब्रँडेड ४ जी स्मार्टफोन खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. Alcatel 1 2021 सिंगल रियर कॅमेरा आणि Alcatel 1 एल प्रो ड्युअल रियर कॅमेर्‍यासह लॉन्च करण्यात आला आहे. Alcatelने हे बजेट स्मार्टफोन अँड्रॉइड ११ (गो एडिशन) ऑपरेटिंग सिस्टम आणि क्वाड कोअर प्रोसेसरसह लाँच केले आहे. वाचा : रंग पर्याय आणि किंमत Alcatel ने आपला नवीन स्मार्टफोन युरोप आणि अमेरिकेच्या बाजारात दाखल केला असून येत्या काही दिवसांत ते भारतासह इतर आशियाई देशांमध्ये उपलब्ध होऊ शकतो. Alcatel 1 2021 एआय एक्वा आणि व्हॉल्कोनो ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये लॉन्च करण्यात आला असून त्याची किंमत ५९ Eur युरो म्हणजेच ५,३०० रुपये आहे. तर , अल्काटेल 1 एल प्रो पॉवर ग्रे आणि ट्वायलाइट ब्लू कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. ज्याची, किंमत १२७ डॉलर म्हणजेच सुमारे ९,५०० रुपये आहे. या दोन्ही स्मार्टफोनची विक्री ऑगस्ट-सप्टेंबरपासून सुरू होईल. Alcatel 1 2021 वैशिष्ट्य Alcatel 1 2021 ५ इंच एफडब्ल्यूव्हीजीए + डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रेझोल्यूशन ४८०x९६० पिक्सल आहे. हा फोन अँड्रॉइड ११ (गो एडिशन) सह सादर करण्यात आला असून यात क्वाड कोर मीडियाटेक एसओसी प्रोसेसर आहे. Alcatel 1 2021 मध्ये १ जीबी रॅम तसेच ५ जीबी आणि १६ जीबी स्टोरेज पर्याय देण्यात आला आहे. या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा रीअर कॅमेरा तसेच २ एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. यात २,००० एमएएच बॅटरी आहे. Alcatel 1L Pro वैशिष्ट्य Alcatel 1L Pro च्या वैशिष्ट्यांविषयी सांगायचे तर, यात ६.१ इंचचा एचडी + डिस्प्ले आहे. Android ११ (गो एडिशन) असलेल्या या फोनमध्ये ऑक्टा-कोर एसओसी प्रोसेसर आहे. हा Alcatel फोन २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. अल्काटेल 1 एल प्रो मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात, १३ मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर, दुय्यम सेन्सर २ मेगापिक्सेल आहे. या फोनमध्येही उत्कृष्ट बॅटरी देण्यात आली आहे. वाचा : वाचा : वाचा :


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vYHlHG

Comments

clue frame