भन्नाट फीचर्स! ही कंपनी लाँच करणार 48 MP ड्यूल कॅमेरासह शानदार स्मार्ट टीव्ही

नवी दिल्ली : भारतात स्मार्टफोन्ससह मार्केटमध्ये देखील स्वतःचे स्थान निर्माण करणारी लोकप्रिय कंपनी लवकरच स्मार्ट टीव्ही लाँच करणार आहे. या टीव्हीचे फीचर्स जबरदस्त आहे. आतापर्यंत तुम्ही २-४ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येणाऱ्या स्मार्ट टीव्हींबद्दल ऐकले असेल. मात्र, आपल्या अपकमिंग फ्लॅगशिप ६ ला ४८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासोबत सादर करणार आहे. टीव्हीत एक नाही, तर दोन-दोन कॅमेरे मिळतील. वाचाः सध्या अँड्राइड स्मार्ट टीव्हीवरून व्हिडीओ कॉलिंग वाढले आहे. अशात शाओमी ग्राहकांसाठी असा स्मार्ट टीव्ही आणत आहे, ज्यात स्मार्टफोन्सचा देखील आनंद घेता येईल. Mi TV 6 फ्लॅगशिप स्मार्ट टीव्ही २८ जूनला चीनमध्ये लाँच होईल. आतापर्यंत Samsung आणि Huawei सोबत Xiaomi हीच अशी कंपनी आहे, ज्यांनी इन-बिल्ट कॅमेऱ्यासोबत स्मार्ट टीव्ही लाँच केले आहे. मात्र, पहिल्यांदाच शाओमी आपल्या टीव्ही ड्यूल कॅमेरा देणार आहे. या टीव्हीला लवकरच चीन आणि भारतासह इतर देशात लाँच केले जाईल. वाचाः लाँचच्या आधीच चे स्पेसिफिकेशन्स डीटेल्स लीक होत आहे. यातील मुख्य फीचर कॅमेऱ्याचेच आहे. शाओमी अपकमिंग स्मार्ट टीव्हीला ‘new interactive mode’ टॅगलाइनसोबत सादर करेल. मिळतील जबरदस्त फीचर्स Xiaomi Mi TV 6 च्या संभाव्य फीचर्सबद्दल सांगायचे तर याच्या डिस्प्लेमध्ये QLED Quantum Dot Technology चा वापर केला जाईल. सोबतच, IQ ने सुसज्ज असेल. यामुळे टीव्ही आपोआप अँबिएंट लाइटला एडजस्ट करतो. एमआय टीव्ही ६ मध्ये स्पेशल ऑडिओसोबत ४.२.२ सराउंड साउंड मिळेल. यात १०० वॉटचा इन-बिल्ट स्पीकर वाय-फाय ६, दोन एचडीएमआय पोर्ट, गेमिंगसाठी एएमडी फ्रींसिक प्रीमियमसह अनेक खास फीचर्स मिळतील. पुढील काही दिवसात शाओमीच्या या शानदार टीव्हीचे आणखी काही फीचर्स समोर येतील. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3d8p2th

Comments

clue frame