नवी दिल्लीः Xiaomi ने आपल्या टीव्ही सेगमेंटला वाढवत आणखी दोन नवीन टीव्ही लाँच केले आहेत. या नवीन टीव्ही रेंज मध्ये आणि चा समावेश आहे. शाओमी हाय अँड टीव्ही सेगमेंटच्या टीव्हीला टक्कर देण्यासाठी हे नवीन टीव्ही लाँच केले आहेत. कंपनीने या टीव्हीची किंमत १० हजार युआन म्हणजेच जवळपास १ लाख १५ हजार रुपये किंमत ठेवली आहे. Mi TV 6 मध्ये ड्युअल कॅमेरा सोबत लाँच केले आहे. हा टीव्ही या फीचरमध्ये पहिला टीव्ही आहे. वाचाः Mi TV 6 Extreme Edition चे फीचर्स Mi TV 6 एक्सट्रीम एडिशन एक स्लीम आणि हलक्या डिझाइनमध्ये लाँच केले आहे. हे एक 3D LUT फिल्म टेक्नोलॉजी ग्रेड कलर करेक्शनला सपोर्ट करते. यात MediaTek MT9950 चिपसेटचे एनहांस्ड वर्जन दिले आहे. डिस्प्ले 120Hz हाय रिफ्रेश रेट आणि 120Hz MEMC ऑफर करते. या टीव्हीची हायलाइटिंग फीचर मध्ये एक स्पीकर दिले आहे. जे १०० वॉटचे ऑडियो सिस्टम सोबत येते. याशिवाय, Mi TV 6 एक्सट्रीम एडिशनही IMAX एन्हांस्डला सपोर्ट करते. या टीव्हीला मोठ्या गेमिंग डिस्प्लेच्या रुपात वापर केला जाऊ शकतो. टीव्हीत पुढच्या बाजुला ४८ मेगापिक्सलचा ड्युअल एआय कॅमेरा दिला आहे. त्यावरुन युजर्स व्हिडिओ कॉल करू शकतील. वाचाः Mi TV ES 2022 चे फीचर्स शाओमीने आणखी एक नवीन टीव्ही लाँच केला आहे. ज्यात एक मल्टी झोन बॅकलाइट सिस्टम दिले आहे. हा टीव्ही MediaTek MT9638 chip चिपला सपोर्ट करतो. Mi TV ES 2022 मध्ये दोन 12.5W चे स्पीकर सिस्टम आहे. जे स्टिरियो प्लेबॅकला सपोर्ट करते. हा टीव्ही ९७ टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो आणि बिल्ट इन जिओएआय व्हाइस असिस्टेंट सोबत येते. Mi TV 6 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज सोबत येते. वाय फाय आणि ब्लूटूथ ५.० ला सपोर्ट करते. वाचाः Mi TV 6 Extreme Edition ची किंमत Mi TV 6 Extreme Edition च्या ५५ इंच डिस्प्ले व्हेरियंटची किंमत ५९९९ युआन म्हणजेच ६८ हजार ९६३ रुपये आहे. तर ६५ इंच टीव्हीची किंमत ७९९९ चिनी युआन म्हणजेच ९१ हजार ९५५ रुपये आहे. ७५ इंचाच्या टीव्हीची किंमत ९९९९ युआन म्हणजेच १ लाख १४ हजार ९४६ रुपये किंमत आहे. वाचाः Mi TV ES 2022 ची किंमत Mi TV ES 2022 ला तीन वेगवेगळ्या साइजमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. ज्यात ५५ इंच टीव्हीची किंमत ३३९९ युआन म्हणजेच ३९ हजार ७४ रुपये आहे. ६५ इंच टीव्हीची किंमत ४३९९ युआन म्हणजेच ५० हजार ५७० रुपये आहे. तर ७५ इंचाच्या टीव्हीची किंमत ५९९९ युआन म्हणजेच ६८ हजार ९६३ रुपये आहे. या दोन्ही टीव्हीचा सेल ९ जुलै २०२१ रोजी सुरू होणार आहे. वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jmcFO7
Comments
Post a Comment