चीनपासून नॉर्थ कोरियापर्यंत या देशात WhatsApp वर बंदी, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः भारतात नवीन आयटी नियमांवरून सध्या इंस्टेंट मेसेजिंग अॅप आणि आणि केंद्रा सरकार यांच्यात जोरदार वाद उभा राहिला आहे. नवीन नियमांच्या माहितीनुसार, गरज पडल्यास व्हॉट्सअॅपला कोणत्याही मेसेजची first originatorची माहिती द्यावी लागेल. WhatsApp च्या माहितीनुसार, असे करणे म्हणजे अँड टू अँड एन्सक्रिप्शन फीचर सोबत बेईमानी करणे होय. त्यामुळे भारतात व्हॉट्सअॅपवर बंदी घालण्यात जाऊ शकते, असे बोलले जात आहे. परंतु, त्याआधी जाणून घ्या कोणकोणत्या देशात व्हॉट्सअॅपवर बंदी आहे. तुमची इच्छा असूनही तुम्ही त्या ठिकाणी व्हॉट्सअॅप चालवू शकत नाही. वाचाः चीनः २०१७ मध्ये व्हॉट्सअॅपला चीन मध्ये सरकारने बंदी घातली आहे. ही बंदी अजूनही कायम आहे. चिनी सरकार आणि सोशल मीडिया कॉन्टेंटला कंट्रोल करू पाहत आहे. जे व्हॉट्सअॅपच्या मजबूत एन्क्रिप्शन कोड मुळे शक्य होत नाही. तसेच चीनमधील WeChat अॅपला प्रोत्साहन देण्यासाठी व्हॉट्सअॅपवर बंदी घातल्याचे बोलले जात आहे. वाचाः उत्तर कोरियाः चीन प्रमाणे किम जोंग उन ने नॉर्थ कोरियात व्हॉट्सअॅपला मजबूत एन्क्रिप्शन पॉलिसीच्या कारणामुळे बंदी घातली आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, २०१८ मध्ये ही बंदी घातली गेली होती. उत्तर कोरियाच्या लोकांसाठी इंटरनेट उपलब्ध नाही. केवळ विदेशी नागरिक आणि काही खास लोकांसाठी वायरलेस इंटरनेट कनेक्शनचा वापर केला जात आहे. वाचाः संयुक्त अरब अमिरातः संयुक्त अरब अमिरात च्या लोकांना व्हॉट्सअॅप किंवा फेसटाइम वर व्हिडिओ कॉलिंगची परवानगी नाही. या बंदीला व्हॉट्सअॅपच्या एन्क्रिप्सन पॉलिसीशी काही देणे घेणे नाही. सरकारने असे यूएआयच्या लोकल टेलिकम्यूनिकेशन सर्विसला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशाचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला होता. वाचाः सीरीयाः सीरीया मध्ये सुद्धा व्हॉट्सअॅपची एन्क्रिप्शन पॉलिसी मुळे अॅपवर बंदी घालण्यात आली होती. सीरीयाच्या सरकारचे म्हणणे होते की, शत्रू व्हॉट्सअॅप एंड-टू-एंड एन्क्रिप्शन धोरणाचा वापर करून त्यांच्याविरुद्ध कट कारस्थान करू शकतो. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fMoXM8

Comments

clue frame