Samsung Crystal 4K Series : UHD सेगमेंटमध्ये डिस्प्ले टेक्नोलॉजीच्या बाबतीत नवीन बेंचमार्क

तुम्ही आपला बहुतांश वेळ नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर सीरिज, चित्रपट पाहण्यात घालवत आहात ? भरपूर अ‍ॅक्शन असलेला ‘Fauda’ असेल की ‘Shetland’ या सीरिज कोणत्याही डिव्हाइसवर उपलब्ध होतात, मात्र आपण अशा इंटरटेनमेंट जगात राहतो, जेथे मोठ्या पडद्यावर पाहण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. एक ब्रँड या सर्व गोष्टींवर खरा उतरतो. तो म्हणजे भारतातील ग्राहकांचा सर्वात विश्वसनीय इलेक्ट्रॉनिक ब्रँड्स पैकी एक असेलला Samsung. Samsung ने आपल्या नवीन जनरेशन च्या लाँचिंगसोबत जबरदस्त 4K व्ह्यूईंग अनुभवासह UHD सेगमेंटमध्ये डिस्प्ले आणि डिझाइनच्या बाबतीत नवीन बेंचमार्क तयार केला आहे. Samsung चा नवीन टीव्ही Crystal 4K आणि 4K pro या दोन रेंजमध्ये उपलब्ध आहे. यात Samsung's next generation Crystal डिस्प्ले देण्यात आला आहे, जो ब्राइट आणि रंगांच्या बाबतीत शानदार आहे. सोबतच, साउंड टेक्नोलॉजी आणि अल्ट्रा-थिन डिझाइनमुळे टीव्ही अधिकच आकर्षक वाटतो. शो बघताना, गेमिंग्ससाठी व वर्क फ्रॉम होमसाठी हा टीव्ही तुमच्या जुन्या टीव्हीच्या जागी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. Crystal डिस्प्ले सोबत 4K UHD रिझॉल्यूशन Samsung Crystal 4K UHD TV मध्ये काय खास आहे, ते जाणून घेऊया.Crystal डिस्प्लेसह 4K UHD यूएचडी रिझॉल्यूशन Crystal 4K UHD डिस्प्लेमध्ये ऑप्टमाइज कलर एक्स्प्रेशनसह असंख्य कलर्सचा अनुभव मिळतात, जेणेकरून तुम्हाला बारीक गोष्ट देखील पाहता येईल. Crystal 4K UHD हे नियमित FHD च्या तुलनेत चारपट अधिक पिक्सल्ससोबत येते व यात सीनमधील प्रत्येक छोट्यातील छोटी गोष्ट पाहता येते. याशिवाय 16bit 3D कलर मॅपिंग टेक्नोलॉजीमुळे चित्रपट आणि व्हिडीओ अगदी सुक्ष्मरित्या पाहता येतात. पाहताना तुम्हाला यामुळे आकर्षक आणि स्पष्ट अनुभव येईल. तसेच, हा TV Crystal 4K प्रोसेसर सोबत येतो, जे कमी रिझॉल्यूशनचे व्हिडिओ, रंग आणि कॉन्ट्रॉस्ट रेशियो ऑप्टमाइज व HDR चे विश्लेषण करते. जबरदस्त पिक्चर क्वॉलिटीची गॅरंटी तुम्ही पाहत असलेल्या चित्रपटापैकीच तुम्ही एक आहात, असे तुम्हाला शेवटचे कधी वाटले होते ? लक्षात नाही ? मात्र आता तुम्ही Samsung 4K घरी घेऊन आल्यावर तुमचा हा अनुभव देखील पूर्ण होईल, कारण याच्या purcolor मुळे तुम्ही स्वतःच चित्रपटाचा भाग असल्यासारखे वाटते. बॅकलाइट्स आणि मॅचिंग कलर फिल्टरमुळे पिक्चर क्वालिटी ही नॅच्यूरल आणि अचूक रंग दर्शवते. याच्या नेटिव्ह व्हाइट फीचरमुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय ऑप्टमाइज्ड कलर टोन्सचा अनुभव घेता येतो. एवढेच नाही तर जेव्हा तुम्ही अंधारातील सीनमधील बारीक गोष्ट देखील पाहू शकता, त्याचवेळी HDR मुळे लाइट लेव्हल्स देखील वाढवता येते. यामुळे स्क्रिनवरील दृष्य अगदी स्पष्टपणे पाहता येते. थिएटरसारखी साउंड क्वॉलिटी तुम्ही थिएटरप्रमाणे बॅलेन्स, बास आणि साउंटच्या अनुभव घेऊन खूप दिवस झाले असतील, तर क्रिस्टल 4K UHD TV मुळे आता हा अनुभव तुम्हाला घेत येणार आहे. यातील Q-Symphony या फीचरमुळे टीव्ही आणि साउंडबारचे स्पिकर्स एकाचवेळी वापरता येतात, ज्यामुळे थिएटरसारखा अनुभव येतो. सोबतच, Samsung चे Q सीरिज साउंडबार देखील आहे. याशिवाय तुमच्या आजुबाजूचे वातावरण व तुम्ही पाहत असलेल्या गोष्टीवरून आपोआप आवाज नियंत्रण करणारे अ‍ॅडापिटिव्ह साउंड फीचर देखील यात आहे. त्यामुळे निवांत बसा आणि घरीच थिएटर सारखा अनुभव घ्या. अत्याधुनिक आकर्षक डिझाइन Crystal 4K रेंज ही next generation टेक्नोलॉजीसोबत येते, ज्यात आधीपेक्षा खूपच स्लीम साइज देण्यात आली आहे. याचे मॉडर्न, नाजूक आणि मोहक 3 साइडला पट्टी नसणारे एअरस्लिम डिझाइन हे आकर्षक चित्र दाखवण्यासोबतच कोठेही सहज सामावून जाते. प्रत्येक क्षण कॅच करणारेः motion xcelerator टीव्हीतील आणखी एक दमदार फीचर म्हणजे motion xcelerator. यामुळे स्पष्ट पिक्चर आणि परफॉर्मेंसचा अनुभव घेता येतो. कारण हे फीचर कॉन्टेंटनुसार ऑपोआप रिकामी फ्रेम भरून काढते. बिल्ट-इन वॉइस असिस्टंट मॉडेल्स हे बिल्ट-इन अलेक्सा आणि बिक्सबी सपोर्टसह येते. यामुळे कॉन्टेंट, उत्तरे सहज मिळते आणि टीव्ही कंट्रोल करण्यास सोपे जाते. ट्रेंडसोबत ट्यून असणारं सॅमसंग टीव्ही प्लस तुम्हाला यासोबत Samsung चे व्हर्च्यूअल चॅनेल Samsung TV plus चा देखील मोफत आनंद घेता येईल. यामध्ये तुम्हाला विविध चॅनेल्सवर अनेक ट्रेंडिंग विषयावरील माहिती पाहता येईल. यामुळे तुम्हाला दिवसातील महत्त्वाच्या विषयांची देखील माहिती मिळेल. कॉन्टेंट गाइडमुळे काम सोपे अ‍ॅप ओपन न करताच तुम्हाला सहत तुमच्या आवडीचे कॉन्टेंट सापडेल. कॉन्टेंट गाइडमुळे ब्रॉडकास्ट, स्ट्रिमिंग चॅनेल्स, तसेच तुमच्या आवडीचे चॅनेल्स आधीच लिस्ट केलेले मिळतील, यामुळे तुमचा सर्च करण्यात वेळ जाणार नाही. इतकच नाही तर यात हे दमदार फीचर्स पीसी ऑन टीव्ही या फीचरमुळे तुम्हाला तुमच्या पीसीवरील काम सहज टीव्हीवर करता येईल. टॅप व्ह्यू या फीचरमुळे केवळ एका क्लिकवर मोबाइलमधील गाणी अथवा चित्रपट पाहण्याचा आनंद टीव्हीवर घेता येईल. जेव्हा तुम्ही मोबाइलद्वारे टीव्हीवर टॅप करता, त्यावेळी टीव्ही आपोआप मोबाइलवरील कॉन्टेंट त्यावर दाखवते. यामुळे सोप्या आणि अगदी जलद पद्धतीने टीव्हीवर तुमचा आवडता कॉन्टेंट पाहण्याचा आनंद घेता येईल. किंमत आणि ऑफर Samsung crystal 4k UHD आपल्या सेगमेंटमधील सर्वोत्तम आहे व तसेच हटके टीव्ही शोधत असणाऱ्यांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुमच्या गरजेनुसार व किंमतीनुसार तुम्ही Crystal 4k आणि Crystal 4k pro दोन्ही मॉडेलमध्ये 43, 50 आणि 55 इंचची निवड करू शकता. यासोबतच Crystal 4k pro मध्ये 58 इंचचा पर्याय देखील ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. amazon, Flipkart आणि Samsung e-store वर या टीव्हीची किंमत 37,990 रुपयांपासून सुरू होते. यावर ईएमआय आणि बँक कॅशबॅक ऑफर देखील मिळेल. मात्र, ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. त्यामुळे, हा आकर्षक आणि जबरदस्त फीचर्स असणारा टीव्ही आजच खरेदी करा व एक नवीन अनुभव घ्या. डिस्क्लेमर : ही एक ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमने प्रकाशित केली आहे.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hUBQ9R

Comments

clue frame