नवी दिल्ली : ई-कॉमर्स वेबसाइट वर सेल सुरू आहे. हा सेल २८ मे ते ३० मे पर्यंत चालेल. या दरम्यान अनेक स्मार्टफोन्सला बंपर ऑफरसह खरेदी करता येईल. जर तुम्ही नवीन आणि कमी किंमतीचा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे. सेलमध्ये वर सूट मिळत आहे. २१,९९९ रुपया सुरुवाती किंमतीत येणाऱ्या या फोनला कमी किंमतीत खरेदी करता येईल. यावर मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊया. Samsung Galaxy M42 5G वर मिळत आहे जबरदस्त डिस्काउंट: याच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २१,९९९ रुपये आहे. यावर ११,१०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. ग्राहकांना पूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास फोनला केवळ १०,८९९ रुपयात खरेदी करता येईल. यावर १००० रुपये कूपन डिस्काउंट देखील मिळत आहे. तसेच, नो कॉस्ट ईएमआय आणि स्टँडर्ड ईएमआयवर फोनला खरेदी करता येईल. फोनला स्टँडर्ड ईएमआयवर १,०३६ रुपयात २४ ईएमआयवर खरेदी करता येईल. एसबीआयच्या क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास २ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट देखील मिळेल. वाचाः याचे दुसरे व्हेरिएंट ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसोबत येते. याची किंमत २३,९९९ रुपये आहे. यासोबत ११,१०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. पूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास फोनला १२,८९९ रुपयात खरेदी करता येईल. यावर १००० रुपये कूपन डिस्काउंट देखील मिळत आहे. नो कॉस्ट ईएमआय आणि स्टँडर्ड ईएमआयवर फोनला खरेदी करता येईल. फोनला स्टँडर्ड ईएमआयवर १,१३० रुपयात २४ ईएमआयवर खरेदी करता येईल. एसबीआयच्या क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास २ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट देखील मिळेल. Samsung Galaxy M42 5G चे फीचर्स फोनमध्ये ६.६ इंचचा सुपर एमोलेड एचडी+ इनफिनिटी-यू डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे पिक्सल रिझॉल्यूशन ७२०x१६०० रुपये आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७५०G ऑक्टा-कोर ५G प्रोसेसरसोबत येतो. यात ८ जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रो एसडी कार्डद्वारे १ टीबीपर्यंत वाढवता येईल. फोन अँड्राइड ११ वर चालतो. फोटोग्राफीसाठी यात क्वाड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याचा प्रायमरी सेंसर ५९ मेगापिक्सल (F/१.८), दुसरा ८ मेगापिक्सल (F/२.२) अल्ट्रा-वाइड सेंसर, तिसरा ५ मेगापिक्सल (F/2.४) डेप्थ सेंसर आहे. तर चौथा ५ मेगापिक्सल (F/2.4) मॅक्रो सेंसर आहे. सेल्फीसाठी यात २० मेगापिक्सलचा सेंसर मिळेल. ज्याचे अपर्चर f/२.२ आहे. फोनमध्ये ५०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uvlWVS
Comments
Post a Comment