Redmi Note 10 Pro 5G स्मार्टफोन लाँच, किंमत-फीचर्स पाहा

नवी दिल्लीः शाओमीने आपला स्मार्टफोन लाँच केला आहे. रेडमी नोट १० सीरीजच्या या नवीन मोबाइलला शाओमीने Redmi Note 10 Pro 4Gच्या तुलनेत अपेक्षित अनेक चांगले फीचर्ससोबत लाँच केले आहे. याआधी शाओमीने रेडमी नोट १० प्रो जी लाँच केला आहे. रेडमी नोट १० प्रोच्या ५ जी मॉडलला पॉवरफुल MediaTek Dimensity 1100 SoC प्रोसेसर आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत लाँच केले आहे. वाचाः Redmi Note 10 Pro 5G ला ८ जीबी रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेजच्या ऑप्शनमध्ये लाँच केले आहे. रेडमीच्या या फोनचा लूक ४ जी व्हेरियंट सारखाच आहे. परंतु, फीचर्स मध्ये हा चांगला आहे. या फोनच्या ५जी मॉडलचा कॅमेरा सेटअप वेगळा ठेवला आहे. शाओमीने आज रेडमी नोट १० ५जी सुद्धा लाँच केला आहे. वाचाः किंमत आणि व्हेरियंट Redmi Note 10 Pro 5Gला चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. कंपनीने या फोनला मून सोल, स्टार यार्न आणि मॅजिक ग्रीन कलर ऑप्शन मध्ये लाँच केले आहे. या फोनच्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत १५९९ युआन म्हणजेच १८ हजार २०० रुपये आहे. तर याच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १७९९ युआन म्हणजेच २० हजार ५०० रुपये आहे. रेडमी नोट १० प्रो ५ जी च्या ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत १९९९ युआन म्हणजेच २२ हजार ८०० रुपये आहे. चीनमध्ये या फोनची प्री ऑर्डर केल्यानंतर ११०० रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. या फोनची विक्री १ जून पासून सुरू होणार आहे. वाचा : Redmi Note 10 Pro 5G चे फीचर्स या फोनध्ये ६.६ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. तसेच स्क्रीन रिझॉल्यूशन 2400x1080 पिक्सल आहे. हा फोन अँड्रॉयड ११ बेस्ड MIUI 12.5 ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतो. रेडमीच्या या फोनमध्ये MediaTek Dimensity 1100 SoC प्रोसेसर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. ६७ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. वाचा : जबरदस्त कॅमेरा Redmi Note 10 Pro 5G च्या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी सेन्सर ६४ मेगापिक्सलचा आहे. सोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड लेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रेडमीच्या या फोनमध्ये ड्यूअल ऑडियो स्पीकर दिला आहे. हा फोन IP53 सर्टिफाइड डस्ट आणि वॉटर रजिस्टेंट आहे. वाचा :


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uscZg9

Comments

clue frame