६ कॅमेराचा Realmeच्या स्मार्टफोनवर १३ हजारांची सूट, आज अखेरचा दिवस

नवी दिल्लीः Realme X50 Pro स्मार्टफोन ला Flipkart Shop from Home Days सेल मध्ये विक्रीसाठी लिस्ट करण्यात आले आहे. हा सेल आज २९ मे रोजी रात्री १२ वाजता संपणार आहे. या सेलमध्ये Realme X50 Pro स्मार्टफोनला १३ हजार रुपयांच्या मोठ्या डिस्काउंट ऑफर सोबत खरेदी करता येऊ शकतो. Realme X50 Pro भारतातील पहिला ५जी स्मार्टफोन आहे. जो एकूण ६ कॅमेरा सोबत येतो. फोनच्या रियर पॅनेलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तर फ्रंट मध्ये ड्यूअल कॅमेरा सेटअप दिला आहे. Realme X50 Pro स्मार्टफोन संबंधी जाणून घ्या डिटेल्स. वाचाः ची किंमत Realme X50 Pro 5G स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडलला २४ हजार ९९९ रुपयात खरेदी केले जाऊ शकते. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडलला ३० हजार ९९९ रुपयांत खरेदी केले जाऊ शकते. फोनला मोस ग्रीन आणि रस्ट रेड कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. फोनला १० टक्के बॅकिंग डिस्काउंटमध्ये खरेदी केले जाऊ शकते. याशिवाय फोनला ५ हजार १६७ रुपये प्रति महिना EMI ऑप्शन मध्ये खरेदी करू शकता. वाचाः Realme X50 Pro 5G चे फीचर्स Realme X50 Pro 5G ला Qualcomm Snapdragon 865 प्रोसेसर सोबत आणले आहे. हा फोन अँड्रॉयड १० ओएस वर काम करतो. यात पॉवर बॅकअपसाठी ६५ सुपरडाट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 4,200mAh ची बॅटरी दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.४४ इंचाचा ड्युअल पंच होल डिस्प्ले आणि क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा आहे. तर १२ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आणि एक B & W लेन्स दिला आहे. यात ड्युअल फ्रंट कॅमेरा दिला आहे. ३२ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wLQtk3

Comments

clue frame