नवी दिल्लीः रियलमीने सोमवारी भारतात आपली नवीन स्मार्ट टीव्ही सीरीज लाँच केली आहे. नवीन रियलमी टीव्ही सीरीजमध्ये कंपनीने ४३ इंच आणि ५० इंच स्क्रीन साइजची दोन टीव्ही लाँच केली आहेत. या टीव्हीची किंमत २७ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. याशिवाय, कंपनीने Realme X7 Max 5G स्मार्टफोनला लाँच केले आहे. जाणून घ्या या टीव्हीची किंमत आणि फीचर्ससंबंधी माहिती. वाचाः Realme Smart TV 4K ची किंमत रियलमी स्मार्ट टीव्ही ४के च्या ४३ इंच स्क्रीन टीव्हीची किंमत २७ हजार ९९९ रुपये आहे. तर ५० इंच स्क्रीनच्या टीव्हीची किंमत ३९ हजार ९९९ रुपये आहे. रियलमी टीव्ही ४के ची विक्री ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि रियलमीची साइट वर ४ जून पासून सुरू होणार आहे. वाचाः Realme Smart TV 4K चे फीचर्स रियलमी स्मार्ट टीव्ही ४के सीरीजमध्ये येणाऱ्या ४३ इंच आणि ५० इंच स्क्रीन साइज टीव्ही अँड्रॉयड टीव्ही १० ओएस सोबत येते. स्क्रीन रिझॉल्यूशन 3840x2160 पिक्सल आणि आस्पेक्ट रेशियो 16:9 आहे. स्मार्ट टीव्हीत क्वॉड कोर मीडियाटेक प्रोसेसर व २ जीबी रॅम दिला आहे. या टीव्हीत १६ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. ऑडियोसाठी या टीव्हीत ४के चार स्पीकर दिले आहे. जे एकूण २४ वॉट आउटपूट डिलिवर करते. ऑडियो एक्सपिरीयन्स अधिक चांगला करण्यासाठी कंपनीने डॉल्बी एटमॉस, डॉल्बी ऑडियो आणि डीटीएस एचडी सपोर्ट सारखे फीचर्स दिले आहेत. टीव्हीत चार मायक्रोफोन्स दिले आहेत. ज्यात गुगल असिस्टेंट सपोर्ट सोबत हँड्स फ्री व्हाइस कंट्रोल इनेबल देते. वाचाः रियलमी टीव्हीत अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, आणि यूट्यूब सारखे अॅप्स आधीच इन्स्टॉल केले आहेत. स्मार्ट टीव्ही मध्ये गुगल प्ले स्टोर आणि इन बिल्ट क्रोमकास्ट सपोर्ट दिले आहेत. कनेक्टिविटीसाठी यात रियलमी स्मार्ट टीवी 4K मध्ये वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, इन्फ्रारेड, दोन एचडीएमआय पोर्ट, दोन यूएसबी पोर्ट, एक एचडीएमआय आर्क पोर्ट आणि एक LAN (ईथरनेट) पोर्ट दिले आहे. रियलमी स्मार्ट टीवी 4K मध्ये ब्लूटूथ इनेबल्ड रिमोट आहे. ज्यात अॅमेजॉन प्राइम विडियो, गूगल असिस्टेंट, नेटफ्लिक्स आणि यूट्यूब साठी चार हॉट दिले आहेत. ४३ इंचाचा टीव्ही ६.५ किलोग्रॅम तर ५० इंचाचा टीव्ही ९.२ किलोग्रॅम आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3i5Gsdq
Comments
Post a Comment