Realme Smart TV 4K भारतात ३१ मेला लाँच होतेय, किंमत ऐकून तुम्हाला सुखद धक्का बसणार

नवी दिल्लीः रियलमीने नुकतीच नवीन स्मार्ट टीव्ही ४के भारतात लाँच करण्याचे सांगितले होते. कंपनी ३१ मे रोजी भारतात नवीन लाँच करणार आहे. कंपनी गेल्या काही दिवसांपासून टीव्हीच्या फीचर्सची माहिती उघड करीत आहे. परंतु, आता लाँच आधीच रियलमीच्या टीव्हीचे फीचर्स आणि किंमत लीक झाली आहेत. वाचाः टिप्स्टर Debayan Roy (@Gadgetsdata) च्या हवाल्याने रियलटाइमने सांगितले की, रियलमी स्मार्ट टीव्ही ४के ला ४३ इंच आमि ५० इंच अशा दोन स्क्रीन साइजमध्ये लाँच करणार आहे. कंपनीने एप्रिल मध्ये ४३ इंच टीव्हीचा टीझर जारी केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही स्क्रीन साइजच्या टीव्हीत एक सारखे फीचर्स असणार आहेत. या टीव्हीत ४के डिस्प्ले पॅनेल, डॉल्बी व्हिजन आणि १७८ डिग्री व्ह्यूइंग अँगल सारखे फीचर्स दिले जाणार आहेत. वाचाः रियलमीच्या स्मार्ट टीव्हीत मीडियाटेक प्रोसेसर दिला जाणार आहे. रॅम आणि इंटरनल स्टोरेजची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. सॉफ्टवेयरमध्ये फोन अँड्रॉयड टीव्ही १० वर चालणार आहे. गुगल क्रोमकास्ट आणि गुगल असिस्टेंट सारखे फीचर्स सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी या टीव्हीत ड्युअल बँड वाय फाय, ब्लूटूथ 5.0, 3 HDMI, 2USB, 1 AV आणि ईथरनेट पोर्ट असणार आहे. रियलमीच्या अपकमिंग टीव्हीत २४ वॉट क्वॉड स्टिरियो स्पीकर्स असणार आहेत. वाचाः ज्यात डॉल्बी एटमॉस आणि डीटीएस एचडी सपोर्ट मिळणार आहे. रियलमीच्या स्मार्ट टीव्ही ४के ला भारतात ३० ते ३५ हजार रुपयांच्या दरम्यान लाँच केले जाण्याची शक्यता आहे. रियलमी स्मार्ट टीव्ही ४केला ४३ इंचाला २८ ते ३० हजार तर स्मार्ट टीव्ही ४के ५० इंचाच्या टीव्हीला ३३ हजार रुपये ते ३५ हजार रुपये दरम्यान लाँच केले जाऊ शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yJnmQ2

Comments

clue frame