नवी दिल्ली : ब्रँड ३१ मे ला एक लाँच इव्हेंटचे आयोजन करणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी स्मार्टफोनवरून पडदा हटवणार आहे. तसेच, या इव्हेंटमध्ये डॉल्बी एटमॉस आणि डॉल्बी व्हिजन सपॉर्टसह येणारे टीव्ही देखील लाँच केले जाणार आहे. आता एका रिपोर्टनुसार भारतात एक नवीन बजेट फोन लाँच करण्याची तयारी करत आहे. ला पुढील महिन्यात लाँच केले जाऊ शकते. वाचा : Realme C25s ला मलेशियामध्ये आधीच लाँच करण्यात आले आहे. हे रियलमी सी२५ चे अपग्रेडेट व्हेरिएंट आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम व १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळते. मात्र एका रिपोर्टनुसार हा फोन भारतात ६४ जीबी व्हेरिएंटसोबत लाँच केला जाऊ शकतो. इतर सर्व स्पेसिफिकेशन्स समान असतील. Realme C25s: भारतातील किंमत ची किंमत मलेशियामध्ये ६९९ MYR (जवळपास १२,३०० रुपये) आहे. भारतात देखील सी२५एसला याच किंमतीत लाँच केले जाऊ शकते. वाचा : Realme C25s: स्पेसिफिकेशन्स रियलमी सी25एस मध्ये ६.५ इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे, ज्यात टियरड्रॉप-स्टाइल नॉच देण्यात आले आहे. स्क्रीन-टू-बॉडी रेशिया ८:७ आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G85 प्रोसेसर, ४ जीबी रॅम देण्यात आली आहे. फोनच्या भारतीय व्हेरिएंटमध्ये १२८ जीबी ऐवजी ६४ जीबी स्टोरेज मिळेल. फोनच्या रियर पॅनेलवर फिंगरप्रिंट सेंसर मिळतो. रियलमी सी25एस मध्ये AI ब्यूटी फीचर्स सोबत ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये रियरवर क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यात ४८ मेगापिक्सल प्रायमरी, २ मेगापिक्सल मॅक्रो आणि २ मेगापिक्सल ब्लँक-अँड व्हाइट कॅमेरा आहे. फोनमध्ये पॉवरसाठी ६००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन अँड्राइड ११ वर आधारित UI 2.0 स्किन वर चालतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G VoLTE, जीपीएस, वाय-फाय, ब्लूटूथ आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक सारखे फीचर्स मिळतात. हँडसेट ९.६ मिलीमीटर जाड आणि वजन २०९ ग्रॅम आहे. वाचा : वाचा : वाचा :
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34tiX5X
Comments
Post a Comment