नवी दिल्लीः जवळपास एक वर्षाहून अधिक वेळ बंद केलेल्या रिलायन्स जिओने ९८ रुपयांचा प्लान पुन्हा एकदा लाँच केला आहे. परंतु, यात खास बाब म्हणजे यात कोणतेही खास बेनिफिट्स दिले नाही. उलट याची वैधता आधी २८ दिवस होती. आता फक्त १४ दिवस करण्यात आली आहे. याशिवाय, यात अनलिमिटेड कॉलिंग सोबत हाय स्पीड डेटाचा लाभ मिळू शकतो. यात JioTV, JioCinema आणि सारखे जिओ सूट अॅप्सचे फ्री अॅक्सेस मिळणार आहे. ९८ रुपयांच्या प्रीपेड प्लानला पुन्हा आणल्याने जिओ रिचार्ज प्लान पोर्टफोलियोची सुरुवातीची किंमत १२९ रुपयांपासून सुरू होण्याऐवजी ९८ रुपये झाली आहे. वाचाः ओनलीटेककडून सुरूवातीला रिपोर्टमध्ये म्हटले होते की, ९८ रुपयांच्या जिओ प्रीपेड रिचार्ज प्लानला मुंबई येथील टेल्कोकडून गुपचूपपणे लाँच करण्यात आले आहे. हा प्लान १.५ जीबी डेली डेटा हाय स्पीड डेटा सोबत १४ दिवसांसाठी अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग सोबत येतो. यात जिओ अॅप्सचे अॅक्सेसचा समावेश आहे. नवीन ९८ रुपयांचा जिओचा प्लान Jio.com साइट शिवाय, MyJio अॅपवरून खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहे. ग्राहकांना गुगल पे आणि पेटीएम सह थर्ड पार्टी अॅपच्या माध्यमातून याचा रिचार्जचा लाभ मिळू शकतो. वाचाः आधी कोणते फायदे मिळत होते गेल्या वर्षी मे महिन्यात जिओने ९८ रुपयांचा प्लान बंद केला होता. आता पोर्टफोलियोत १२९ रुपयांच्या प्लानमध्ये आपल्या ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त प्लान बनवले होते. या प्लानला बंद करण्याआधी कंपनीने ९८ रुपयांच्या प्लानमध्ये बदल केले होते. त्यात २८ दिवसांची वैधता, २ जीबी हाय स्पीड डेली डेटा आणि फ्री जिओ ते जिओ कॉलिंग सोबत ३०० फ्री एसएमएस यासारखे बेनिफिट्स जोडले होते. वाचाः जिओ फोन युजर्संसाठी वाढवले प्लान या महिन्याच्या सुरुवातीला जिओने जिओ फोन युजर्संसाठी उपलब्ध रिचार्ज प्लान्सची वाढवत ३९ रुयपे आणि ६९ रुपये प्रीपेड प्लान आणले आहेत. दोन्ही प्लानमध्ये १४ दिवसांची वैधता आहे. यात अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगचा समावेश आहे. ३९ रुयपांच्या प्लानमध्ये रोज १०० एमबी डेटा मिळतो. तर ६९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज ०.५ जीबी डेटा बेनिफिट मिळतो. जिओने आपल्या जिओ फोन ग्राहकांसाठी ३०० मिनिट फ्री कॉलिंग आणि एका सोबत एक फ्री रिचार्ज ऑफर आणली आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2RZg9L9
Comments
Post a Comment