नवी दिल्लीः जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत समावेश असलेले अॅमेझॉनचे सीईओ आणि को-फाउंडर आता ई-कॉमर्स कंपनीचे चीफ एग्जीक्युटीव ऑफिसर या पदाचा येत्या ५ जुलै रोजी राजीनामा देणार आहेत. या वर्षी फेब्रुवारीत बेजोस यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहून सीईओ पद सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. या वर्षीच्या थर्ड क्वॉर्टर मध्ये बेजोस कंपनीच्या एग्जीक्यूटिव चेयरमनचे पद सांभाळणार आहे. आता बेजोजच्या जागी अॅमेझॉनचे क्लाउड डिव्हीजन Amazon Web Services चे Andy Jassy नवीन हेड बनणार आहेत. वाचाः ५ जुलै १९९४ ला झाली होती अॅमेझॉनची स्थापना सर्वात खास बाब म्हणजे अॅमेझॉन ५ जुलै १९९४ रोजी स्थापना करण्यात आली होती. त्याच तारखेला बेजोस हे सीईओ पद सोडणार आहेत. यावरून ते भावनिक झाले आहेत. परंतु, नवीन पद मिळतेय यावर ते खूपच उत्साहित आहेत. गेल्या तीन दशकापासून बेजोस अॅमेझॉनशी जोडले गेले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. एका दिवसांत ५.२२ बिलियन डॉलरची ग्रोथनंतर त्यांची संपत्ती २०२ बिलियन डॉलर हून जास्त होती. त्यानंतर बेजोसच्या जागी एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले होते. वाचाः बेजोस यांनी पत्रात कर्मचाऱ्यांना हे म्हटले कंपनीचे पद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर बेजोस यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, मला तुम्हाला सांगायला आनंत होत आहे की, या वर्षीच्या थर्ड क्वॉर्टरमध्ये अॅमेझॉन बोर्डच्या एग्जीक्यूटिव्ह चेयरमनच्या पदावर येईल. आणि एन्डी जेसी सीईओ पदावर येईल. एग्जीक्यूटीव्ह चेयरमन म्हणून मी आपली एनर्जी आणि लक्ष नवीन प्रोडक्ट्सवर केंद्रीत करणार आहे. एन्डी कंपनीत खूप लोकप्रिय आहे. मी अॅमेझॉनमध्ये जितक्या वर्षापासून आहे तितक्या वर्षापासून अॅन्डी सुद्धा आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34rajVi
Comments
Post a Comment