अनलिमिटेड स्टोरेजची सेवा बंद झाल्याने Google Photos मधील फोटो डिलीट होणार ? जाणून घ्या

नवी दिल्ली : १ जूनपासून साठी मिळणारे अनलिमिटेड मोफत स्टोरेज समाप्त होणार आहे. गुगलने याबाबत गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये माहिती दिली होती. यामुळे जर तुम्ही फोटोजचा वापर तुमचे फोटो बॅकअप करण्यासाठी करत असाल तर तुम्हाला देखील आता स्टोरेजची समस्या जाणवू शकते. वाचाः आपोआप डिलीट होणार फोटो ? १ जूननंतर Photos मध्ये असलेला फोटो आपोआप डिलीट होणार का ? असा प्रश्न पडला असेल तर गुगल ने काय बदल केला आहे समजून घेऊया. Google आपल्या यूजर्सला एकूण १५ जीबी मोफत स्टोरेज देणार आहे. या स्टोरेजला , Google ड्राइव और Google Photos अ‍ॅपमध्ये विभागण्यात आले आहे. १ जूनच्या आधीच्या गुगल फोटोजमध्ये high resolution असणारे फोटो अपलोड केले असतील तर त्याला १५ जीबी स्टोरेजमध्ये मोजले जात नव्हते. यूजर्स अनलिमिटेड फोटो अपलोड करू शकत होते. हाच नियम आता बदलण्यात आला आहे. १ जून पासून केवळ १५ जीबीपर्यंत फोटो अपलोड करता येईल, त्यापेक्षा अधिकच्या स्टोरेजसाठी पैसे मोजावे लागतील. वाचाः गुगलचे म्हणणे आहे की, आधीच्या फोटोंवर याचा परिणाम होणार नाही. त्यामुळे १ जूनच्या आधी तुमचे जे फोटो यावर स्टोर केले आहेत, त्यांना १५ जीबी स्टोरेजमध्ये मोजले जाणार नाही व डिलीट देखील होणार नाही. मात्र १ जूनपासून अपलोड करण्यात आलेल्या फोटोंना स्टोरेजमध्ये मोजले जाईल. स्टोरेज खरेदीसाठी किती पैसे ? स्टोरेजसाठी मेंबरशिप घ्यावी लागेल. याचा बेसिक प्लान १०० जीबी पासून सुरू होतो व यासाठी महिन्याला १३० आणि वर्षाला १३०० रुपये द्यावे लागतील. तर २०० जीबीसाठी महिन्याला २१० रुपये, २ टीबीसाठी महिन्याला ६५० रुपये (वर्षाला ६५०० रुपये), १० टीबीसाठी ३,२५० रुपये महिना, २० टीबीसाठी ६५०० रुपये महिना आणि ३० टीबी स्टोरेजसाठी ९,७५० रुपये मोजावे लागतील. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fznzh6

Comments

clue frame