आतापर्यंत COVID-19 व्हॅक्सीन स्लॉट मिळाला नसेल तर 'या' नंबरवर कॉल करा, तात्काळ होणार बुकिंग

नवी दिल्लीः करोना व्हायरस पासून वाचण्यासाठी लस घेणे खूपच गरजेचे आहे. परंतु, आतापर्यंत अनेक जण या लसी पासून दूर आहेत. अनेकांना लसीचा स्लॉट मिळत नाही आहे. अनेकांना हा स्लॉट कसा मिळवायचा याची माहिती सुद्धा नाही. कोविड १९ लस स्लॉट गेल्या काही आठवड्यापासून १८ ते ४४ वर्षाच्या लोकांसाठी ओपन आहे. परंतु, या वर्गातील लोकांसाठी वॉक इन सुविधा नाही. त्यांना आधी अपॉइंटमेंट बुक करावे लागते. त्यानंतर कोविड १९ ची लस घ्यावी लागते. वाचाः याआधी कोविन पोर्टल, आरोग्य सेतू अॅप आणि उमंग अॅप द्वारे कोविड लससाठी अपॉइंटमेंट बुक केले जाऊ शकते. परंतु, आजही असे काही लोक आहेत जे अपॉइंटमेंट बुक करू शकत नाहीत. ग्रामीण भागात याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या लोकांना दिलासा देण्यासाठी भारत सरकारने एक फोन कॉल द्वारे कोविड १९ लस स्लॉट बुक करणे, किंवा रजिस्ट्रेशन प्रोसेस सोपी करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) चे प्रमुख आर. एस. शर्मा यांनी सांगितले की, हेल्पलाइन नंबर १०७५ द्वारे कोविड १९ लस स्लॉट बुक करणे शक्य आहे. वाचाः कॉलवर कसे बुक कराल कोविड १९ लस स्लॉट यासाठी सर्वात आधी आपल्या फोन नंबरवरून १०७५ हेल्पलाइन नंबरला डायल करावे लागेल. ज्यावेळी कॉल कनेक्ट होईल त्यावेळी तुम्हाला विचारले जाईल की तुम्ही कोविन डिटेल्स संबंधी जाणता की नाही, वॅक्सिन स्लॉट बुक करायचे आहे का. आता तुम्हाला लस स्लॉट बुक करण्यासाठी २ नंबर प्रेस करावे लागेल. तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स, पेंशन पासबुक, पासपोर्ट, मतदान कार्ड, किंवा एनपीआर स्मार्ट कार्ड ठेवावे लागेल. यानंतर रिप्रेंसेटेटिव्ह द्वारे सांगितलेले प्रोसेसला फॉलो करा. त्यानंतर तुमची लस अपॉइंटमेंट बुक केली जाईल. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34AADwm

Comments

clue frame