Bugatti ने लाँच केली हँडमेड स्मार्टवॉच, वॉचमध्ये जीपीएस आणि ब्लड ऑक्सिजन मॉनिटर

नवी दिल्लीः Bugatti च्या गाड्यासंबंधी तुम्ही सर्वांनी ऐकले असेल, परंतु, आता बुगातीच्या कारमध्ये बुगातीची स्मार्टवॉच घालून तुम्ही आनंदी प्रवास करू शकता. Bugatti ने आपली पहिली स्मार्टवॉचला लाँच केले आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ही हँडमेड स्मार्टवॉच आहे. कंपनीने एकत्र तीन स्मार्टवॉच मॉडल लाँच केले आहे. ज्यात Bugatti Ceramique Edition One Pur Sport, Bugatti Ceramique Edition One Le Noire आणि Bugatti Ceramique Edition One Divo चा समावेश आहे. या स्मार्टवॉचमध्ये आजचे आवश्यक सर्व फीचर्स आणि जीपीएस आणि ब्लड ऑक्सिजन मॉनिटर दिले आहेत. वाचाः Bugatti स्मार्टवॉचची खास फीचर्स सर्वात आधी तुम्हाला सांगायला पाहिजे की, सर्व स्मार्टवॉच हँडमेड आहेत. ज्यात आयटी आणि वॉचचे एक्सपर्टच्या एका टीमने तयार केले आहे. या वॉच मध्ये १ हजार वेगवेगळे पार्ट्सचा वापर करण्यात आला आहे. बुगाटीचा दावा आहे की, या स्मार्टवॉच मध्ये त्या इंजिनियरिंगचा वापर करण्यात आला आहे. ज्याचा वापर त्यांच्या हायपर स्पोर्ट्स कारमध्ये होतो. स्मार्टवॉचला खरेदी करणाऱ्याला याला कस्टमाइज करण्याचा पर्याय मिळणार आहे. वॉच सोबत रबड स्ट्रॅप आणि टायटेनियम स्ट्रॅपचा पर्याय मिळणार आहे. वाचाः बुगाटीच्या या स्मार्टवॉच मध्ये जीपीएस सेन्सर आहे. याशिवाय यात हार्ट रेट मॉनिटरिंग सोबत स्ट्रेस लेवल आणि ब्लड ऑक्सिजन तपासण्याचे फीचर मिळते. यात 445mAh ची बॅटरी दिली आहे. एकदा फुल चार्ज झाल्यानंतर १४ दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या स्मार्टवॉच मध्ये राउंड अमोलेड डिस्प्ले आहे. याचा रिझॉल्यूशन 390x390 पिक्सल आहे. या वॉच मध्ये ९० हून अधिक स्पोर्ट्स मोड दिले आहेत. या वॉचला वॉटर रेसिस्टेंट साठी 10 ATM ची रेटिंग मिळाली आहे. याला Bugatti Dashboard अॅपने कंट्रोल केले जाऊ शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uzNwBt

Comments

clue frame