गुगलचा स्वस्त स्मार्टफोन येतोय, जिओ सोबत स्वस्त इंटरनेट मिळणारः सुंदर पिचाई

नवी दिल्लीः गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी गुरुवारी एक खास माहिती दिली आहे. कंपनी जिओ सोबर पार्टनरशीप करून एक स्वस्त स्मार्टफोन बनवत आहे. या फोनला लवकरच लाँच केले जाऊ शकते. गेल्या वर्षी गुगलने ३३, ७३७ कोटी रुपयांत जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ७.७ टक्के भागीदारी खरेदी केली होती. सोबत दोन्ही दिग्गज टेक कंपन्यांनी एक कमर्शियल एग्रीमेंट केले होते. याअंतर्गत एक एन्ट्री लेवल स्वस्त स्मार्टफोन बनवण्याचा करार करण्यात आला होता. वाचाः गुगलच्या मदतीने घराघरांत पोहोचणार इंटरनेट सुंदर पिचाई यांनी एशिया पॅसिफिकच्या काही निवडक रिपोर्टर सोबत एक व्हर्च्युअल प्रेस कॉन्फ्रेसिंग मध्ये म्हटले की, एक स्वस्त फोन बनवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. या प्रोजेक्टवर जिओ आणि गुगल मिळून काम करीत आहे. फोनची लाँचिंग आणि त्याची किंमत यासंबंधी माहिती दिली नाही. परंतु, हे कन्फर्म केले की, फोन स्वस्त डेटा सोबत आणला जाणार आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत इंटरनेट पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जातील. गुगलने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुगलचे इंडिया डिजिटायझेशन फंड मध्ये गुंतवणूक केली आहे. याची घोषणा गेल्या वर्षी करण्यात आली होती. वाचाः गुगल वर्षअखेर करणार मोठी घोषणा गुगकडून इंडिया डिजिटाइजेशन फंड (IDF) मध्ये १० बिलियन डॉलरचा फंड टाकला जाऊ शकतो.च सोबत या वर्षीच्या अखेरपर्यंत या प्रोजेक्टवर हायलाइट काम केले जात आहे. वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fpZrNM

Comments

clue frame