१ जून पासून बदलत आहेत गुगल, यूट्यूबसह यांचे नियम, तुमच्या आयुष्यावर किती परिणाम होणार

नवी दिल्ली : १ जून पासून काही महत्त्वाचे बदल होत आहेत. यात टेक्नोलॉजीसंदर्भातील देखील अनेक बदल आहेत. अशात यूजर्सला १ जून पासून होणाऱ्या बदलांबाबत माहिती करून घेणे आवश्यक आहे. १ जून पासून काय बदल होणार आहेत, ते जाणून घेऊया. वाचाः १ जूनपासून बंद होत आहे गुगलची ही खास सेवा १ जूनपासून गुगलकडून मोठा बदल करण्यात येणार आहे. गुगल फोटोमध्ये १ जूनपासून अनलिमिटेड फोटो अपलोड करता येणार नाही, गुगल नुसार आता प्रत्येक जीमेल यूजर्सला १५ जीबी स्पेस दिली जाईल. या स्पेसमध्ये जीमेलच्या ईमेल्ससोबत फोटोचा देखील समावेश आहे. यात गुगल ड्राइव्हवर फोटोज, व्हिडीओ आणि अन्य फाइल्सचा समावेश आहे. १५ जीबी पेक्षा अधिक स्पेस हवी असल्यास गुगल वन स्बस्क्रिप्शन घ्यावे लागेल. यामध्ये अतिरिक्त १०० जीबी स्टोरेज स्पेससाठी १३० रुपये महिना आणि वर्षाला १३०० रुपये द्यावे लागतील. वाचाः युट्यूबवरून पैसे कमवणाऱ्यांना द्यावा लागेल कर युट्यूबवर व्हिडीओ अपलोड करून पैसे कमवणे हा एक सोपा मार्ग झाला आहे. आता अशा लोकांना युट्यूबवरून होणाऱ्या कमाईवर कर द्यावा लागेल. युट्यूबने अमेरिकेच्या बाहेर क्रिएटर्सकडून कर वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. अशात केवळ अमेरिकेतून आलेल्या व्ह्यूजवरून झालेल्या कमाईवर टॅक्स द्यावा लागेल. १ जून पासून हा नियम लागू होईल. आणि चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन स्मार्टफोन कंपनी Itel ने रिलायन्स जिओसोबत मिळून A23 Pro 4G हा स्मार्टफोन आणला आहे. या फोनची मूळ किंमत ४,९९९ रुपये आहे, मात्र लाँचिंग ऑफर अंतर्गत फोनला ३,८९९ रुपयात खरेदी करता येईल. खास गोष्ट म्हणजे फोनच्या खरेदीवर यूजर्सला ३ हजार रुपये रिचार्ज बेनिफिट ऑफर दिली जात आहे. ३ हजार रुपयांचा रिचार्ज बेनिफिट यूजर्सला वेगवेगळ्या वाउचर्स स्वरूपात मिळेल. हे रिडीम करण्यासाठी यूजर्सला २४९ किंवा त्या पुढील रिचार्ज करावे लागेल. Itel A23 Pro 4G स्मार्टफोनची विक्री १ जून पासून सुरू होईल. फोनला रिलायन्स डिजिटल स्टोर, माय जिओ स्टोर, Reliancedigital.in आणि रिटेल स्टोर्समधून खरेदी करता येईल. लाँच होणार ला रिब्रँडेड व्हर्जन स्वरूपात भारतात लाँच केले जाणार आहे. लाँचिंगच्या आधीपासूनच ही गेम लोकप्रिय आहे.या गेमचे प्री-रजिस्ट्रेशन गुगल प्ले स्टोरवरून सुरू आहे. आता याच्या लाँचिंगची तयारी आहे. रिपोर्टनुसार Krafton गेमला १८ जूनला रिलीज करण्याची शक्यता आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yFX1Cv

Comments

clue frame