एक चूक आणि फोनचा होईल स्फोट, स्मार्टफोन चार्ज करताना 'या' चूका टाळा

नवी दिल्ली : लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचाच हातात आता फोन पाहायला मिळतो. किती गरजेचा आहे हे नवीन सांगायला नको. दिवसभर याचा वापर होत असल्याने फोनमधील महत्त्वाचा भाग आहे. फोन नेहमी चार्ज असणे गरजेचे आहे. मात्र आपण अनेकदा स्मार्टफोनच्या बॅटरी संबंधी काही चुका करतो व यामुळे नुकसान सहन करावे लागते. या चुकांमध्ये फोनच्या बॅटरीचा स्फोट होतो अथवा अधिक गरम होते. या चुकांबद्दल जाणून घेऊया, जेणेकरून तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. वाचाः मोबाइल बॅटरीसोबत या चुका करू नका
  • अनेकदा आपण झोपताना उशी खाली मोबाइल ठेवून झोपतो. यामुळे फोनचे तापमान अधिक वाढते व फोन गरम होतो. हे बॅटरीवर अधिक ताण पडल्याने होते. अशात फोनचा स्फोट होण्याची शक्यता वाढते.
  • चार्जर खराब झाल्यावर आपण पैसे वाचवण्यासाठी डुप्लिकेट चार्जर अथवा एडप्टरचा वापर करतो. यामुळे बॅटरी लाइफवर परिणाम होतो. यामुळे फोनचा प्वाइंट देखील खराब होतो. अशात फोनच्या ओरिजनल चार्जरचा वापर करावा.
  • अनेकजण कार चार्जरचा वापर करतात. मोबाइलला कार चार्जरद्वारे चार्ज केल्याने फोनच्या बॅटरीवर परिणाम होतो. कार चार्जर ऐवजी पॉवर बँकचा उपयोग करणे कधीही चांगले.
वाचाः फोन चार्जिंग करताना काय करावे ?
  • फोन अनेकदा गरम होतो, अशावेळी स्विच ऑफ करायला हवा. पुन्हा सामान्य तापमानवर आल्यानंतर त्याचा वापर करावा.
  • फोनची बॅटरी खराब झाल्यास डुप्लिकेट बॅटरी वापरू नये. यामुळे फोन खराब होतो. ओरिजनल बॅटरीच फोनसाठी उपयोगी आहे.
  • रात्रभर फोन चार्जिंगला लावून झोपण्याची सवय असेल तर त्वरित बंद करा. यामुळे फोन अधिक गरम होतो व यामुळे स्फोटचा धोका असतो.
  • थेट सुर्याचा प्रकाश पडेल अशा ठिकाणी ठेवून फोन चार्ज करू नये. यामुळे देखील फोन गरम होतो व स्फोट होण्याचा धोका असतो.
वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3g0lc5Q

Comments

clue frame