जिओचा सर्वात स्वस्त प्लान, ९८ रुपयात मिळेल १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक फायदे

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. कंपनी ग्राहकांसाठी अनेक दमदार प्लान्स आणत असते. डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह कंपनीचे अनेक प्लान्स आहेत. अनेक प्लान्समध्ये स्ट्रिमिंग बेनिफिट्स देखील मिळतात. कंपनीचे अशाच काही स्वस्त किंमती अधिक फायदा देणारे प्लान्स पाहूयात. वाचाः या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला जिओच्या सर्वात प्रीपेड प्लान्सबद्दल सांगत आहोत. जिओचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान ९८ रुपयांचा आहे. या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. अनलिमिटेड वॉइस कॉलिंगसह यात अनेक फायदे मिळतात. जिओचा ९८ रुपयांचा प्रीपेड प्लान या प्लानमध्ये यूजर्सला दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. हा डेटा समाप्त झाल्यानंतर ६४Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरता येईल. या प्लानची वैधता १४ दिवस असून, यात एकूण २१ जीबी डेटा मिळतो. तसेच, यात अनलिमिटेड वॉयस कॉलिंगसह , , , JioSecurity आणि JioCloud सारख्या अ‍ॅप्सचे स्बस्क्रिप्शन मिळते. वाचाः चा १४९ रुपयांचा प्रीपेड प्लान जिओच्या या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा मिळतो. डेटा समाप्त झाल्यानंतर ६४ Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरता येईल. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १००एसएमएसची सुविधा मिळते. याची वैधता २४ दिवस आहे. तसेच, यात JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud सारख्या अ‍ॅप्सचे स्बस्क्रिप्शन मिळेल. जिओचा १९९ रुपयांचा प्लान या प्लानची वैधता २८ दिवस असून, यात दररोज १.५ जीबी डेटा मिळेल. डेटा समाप्त समाप्त झाल्यानंतर ६४ Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. यात अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएची सुविधा मिळेल. प्लानमध्ये JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud सारख्या अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळेल. जिओचा २४९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळेल. इंटरनेट समाप्त झाल्यानंतर यात ६४ Kbps चा इंटरनेट स्पीड मिळेल. तसेच, या प्लानमध्ये अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळेल. या प्लानची वैधता २८ दिवस आहे. अन्य फायद्यांमध्ये यात JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud सारख्या अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fo8eji

Comments

clue frame