नोकियाचे २ जबरदस्त स्मार्टफोन झाले स्वस्त, पाहा नवीन किंमत

नवी दिल्लीः जर तुम्हाला नोकियाचे स्मार्टफोन खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. नोकियाचे दोन जबरदस्त स्मार्टफोन आधीच्या तुलनेत खूपच स्वस्त किंमतीत मिळत आहेत. नोकियाचे आणि Nokia 5.4 स्मार्टफोन स्वस्त झाले आहेत. नोकियाचे हे दोन्ही स्मार्टफोन आधीच्या तुलनेत १ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहेत. जाणून घ्या दोन्ही फोनसंबंधी. वाचाः पाहा इतकी झाली स्मार्टफोनची किंमत Nokia 3.4 स्मार्टफोनची किंमत याआधी ११ हजार ९९९ रुपये होती. आता या फोनची किंमत १० हजार ९९९ रुपये झाली आहे. Nokia 5.4 स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत आधी १३ हजार ९९९ रुपये होती. आता या फोनची किंमत १२ हजार ९९९ रुपये झाली आहे. ही किंमत ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची आहे. ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या Nokia 5.4 ची किंमत आता १४ हजार ४९९ रुपये झाली आहे. नोकिया मोबाइल इंडियाने एक ट्विट करून या दोन्ही स्मार्टफोनच्या नवीन किंमतीची माहिती दिली आहे. वाचाः स्मार्टफोनची फीचर्स नोकिया ३.४ स्मार्टफोनमध्ये ६.३९ इंचाचा HD+ LCD डिस्प्ले दिला आहे. हे V-नॉच सोबत येते. नोकियाचा हा स्मार्टफोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज सोबत येतो. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेज ५१२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. नोकिया ३.४ स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४६० प्रोसेसर वर काम करतो. स्मार्टफोनमध्ये 4,000 mAh ची बॅटरी दिली आहे. स्मार्टफोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक दिला आहे. फोनच्या रियरमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. बॅकमध्ये मेन कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आहे. याशिवाय, फोनच्या बॅकमध्ये २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनच्या फ्रंट मध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा सेल्फी दिला आहे. फोनच्या रियरमध्ये एलईडी फ्लॅश दिला आहे. वाचाः नोकिया ५.४ च्या बॅक मध्ये ४८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा Nokia 5.4 स्मार्टफोन डस्क आणि पोलर नाइट या 2 कलर ऑप्शंसमध्ये येतो. या स्मार्टफोनध्यटे व्ही नॉच सोबत ६.३९ इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. नोकियाचा हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्न्रॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये 4,000 mAh ची बॅटरी दिली आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. स्मार्टफोनच्या रियर मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या बॅकला मेन कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. याशिवाय, फोनच्या मागे २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये फ्रंट मध्ये सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QYYPW3

Comments

clue frame