नवी दिल्ली : दिवसभर मोबाइलचा वापर करत असल्याने अधिक डेटा देणाऱ्या प्लान्सची गरज भासत असते. वर्क फ्रॉम होममुळे देखील डेटाचा वापर अधिक वाढला आहे. अनेक कंपन्यांनी दररोज ३ जीबी डेटासह काही प्लान्स आणले आहेत. हे प्लान्स ५६ दिवस आणि ८४ दिवस वैधतेसह येतात. अशाच दररोज ३ जीबी डेटासह येणाऱ्या सर्वोत्तम प्लान्सविषयी जाणून घेऊया. वाचाः भारतात १ जीबी, १.५ जीबी आणि २+२ जीबी डेटा डेटा पॅक्स देतात. कंपनीने आतापर्यंत ३ जीबी डेटा डेली प्लान आणले नव्हते. मात्र आता कंपनीने ३ जीबी डेली डेटासह येणारे ३ प्लान लाँच केले आहेत. या प्लानची वैधता २८, ५६ आणि ८४ दिवस आहे. या प्लानमध्ये Disney+ Hotstar स्ट्रिमिंग अॅप्सचे स्बस्क्रिप्शन देत आहे. हे सर्व प्लान १ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येतात. ५६ दिवस वैधतेसह दररोज ३ जीबी डेटा देणारे प्लान्स ५६ दिवसांच्या कालावधीत ३ जीबी डेटा देणारा जिओचा कोणताच प्लान नाही. मात्र एअरेटल आणि ३ जीबी डेटाचा प्लान देतात. एअरटेलचा ५५८ रुपयांचा प्लान ५५८ रुपयांच्या प्लानमध्ये ५६ दिवसांसाठी दररोज ३ जीबी डेटा देते. या व्यतिरिक्त अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळेल. स्ट्रिमिंग बेनिफिट्समध्ये यात Mobile Edition आणि Airtel XStream चे स्बस्क्रिप्शन मिळते. अन्य फायद्यांमध्ये यात free hellotunes, Wynk Music, Apollo 24 |7 केयर आणि FastAg चा फ्री अॅक्सेस मिळेल. Vodafone Idea चा ६०१ रुपयांचा प्रीपेड प्लान या प्लानची वैधता ५६ दिवस आहे. यात दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा यात मिळेल. स्ट्रिमिंग बेनिफिट्समध्ये यात Disney+ Hotstar VIP स्बस्क्रिप्शन मिळेल. तसेच, यात हाय स्पीड नाइट टाइम डेटा, विकेंड रोलओव्हर बेनिफिट्स आणि Vi movies & TV चा अॅक्सेस मिळेल. ८४ दिवस वैधतेसह दररोज ३ जीबी डेटा देणारे प्लान्स एअरेटल ८४ दिवस वैधतेसह दररोज ३ जीबी डेटा देणारा कोणताच प्लान देत नाही. मात्र, जिओ आणि व्हीआय हा प्लान्स सादर करतात. Vodafone Idea चा ८०१ रुपयांचा प्रीपेड प्लान या प्लानची वैधता ८४ दिवस असून, यात दररोज ३ जीबी डेटा मिळेल. या प्लानमध्ये अतिरिक्त १६ जीबी डेटा देखील दिला जातो. प्लानमध्ये अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. स्ट्रिमिंग बेनिफिट्समध्ये यात Disney+ Hotstar VIP चे स्बस्क्रिप्शन मिळते. तसेच हाय स्पीड नाइट टाइम डेटा, विकेंड रोलओव्हर बेनिफिट्स आणि Vi movies & TV चा अॅक्सेस मिळेल. वाचाः चा ९९९ रुपयांचा प्रीपेड प्लान जिओच्या या प्लानमध्ये ८४ दिवसांसाठी दररोज ३ जीबी डेटा देते. यात अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. तसेच, प्लानमध्ये जिओ अॅप्सचा अॅक्सेस मिळेल. या सर्व प्लानमध्ये Vodafone Idea सर्वात स्वस्त प्लान सादर करते. ज्यात ८०१ रुपयांमध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळतो. कमी वैधतेचा प्लान हवा असेल तर २८ दिवसांचा प्लान देखील आहे. Vodafone Idea च्या ४०१ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवस असून, यात दररोज ३ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. प्लानमध्ये Disney+ Hotstar VIP चे स्बस्क्रिप्शन देखील मिळेल. तसेच, हाय स्पीड नाइट टाइम डेटा, विकेंड रोलओव्हर बेनिफिट्स आणि Vi movies & TV चा अॅक्सेस यात मिळेल. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fSnHr1
Comments
Post a Comment