जिओ किंवा एअरटेल नाही तर या कंपनीच्या ब्रॉडबँड प्लानमध्ये सर्वात वेगवान इंटरनेट स्पीड आणि जास्त डेटा

नवी दिल्लीः करोना आणि लॉकडाउन मुळे सध्या जास्तीत युजर्स घरून काम करीत आहेत. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याविना चांगले इंटरनेट कनेक्शन आणि स्पीडची गरज असते. वर्क फ्रॉम होम मुळे कंपन्या युजर्संना आकर्षक बेनिफिट प्लान्स ऑफर करीत आहे. या कंपन्यामध्ये एक आहे स्पेक्ट्रा ब्रॉडबँड. ही कंपनी आपल्या ९९९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लान पासून जिओ आणइ एअरटेलसारख्या दिग्गज कंपन्यांना जोरदार टक्कर देत आहे. तर जाणून घ्या या तिन्ही इंटरनेट सर्विस प्रोव्हाइडरमध्ये कोण आपल्या ९९९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लानमध्ये युजर्संना बेस्ट बेनिफिट देत आहे. वाचाः स्पेक्ट्रा ब्रॉडबँडचा ९९९ रुपयांचा प्लान स्पेक्ट्रा ब्रॉडबँडचा हा प्लान अनलिमिटेड डेटा सोबत येतो. कंपनीने स्पष्ट केले आहे की, त्यांचा हा प्लान कोणत्याही FUP (फेयर यूसेज पॉलिसी) मध्ये येतो. युजर्संना अनलिमिटेड डेटाचा फायदा मिळावा यासाठी कंपनी या प्लानमध्ये 250Mbps ची इंटरनेट स्पीड ऑफर करीत आहे. प्लान सोबत युजर्संना फ्री ड्यूअल बँड वाय फाय राउटर सुद्धा दिले जाते. जे गीगाबिट स्पीड सोबत सपोर्ट करते. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात एकसारखीच डाउनलोड आणि अपलोड स्पीड आहे. वाचाः जिओ आणि एअरटेलचा ९९९ रुपयांचा प्लान या दोन्ही कंपन्या आपल्या ९९९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लानमध्ये स्पेक्ट्रा ब्रॉडबँड प्लानप्रमाणे ट्रूली अनलिमिटेड डेटा ऑफर करीत नाही. जिओ (फायबर) आणि एअरटेल (एक्सट्रीम फाइबर) च्या युजर्संना ९९९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लान सोबत 3.3TB डेटा दिला जातो. जिओ फायबर प्लानमध्ये तुम्हाला 150Mbps स्पीड मिळणार आहे. तर एअरटेलच्या या प्लानमध्ये 200Mbps ची इंटरनेट स्पीड ऑफर करीत आहे. वाचाः जिओ फायबर आणि एअरटेल आपल्या प्लानमध्ये युजर्संना पॉप्यूलर ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे फ्री सब्सक्रिप्शन देते. तर स्पेक्ट्रा ब्रॉडबँडच्या प्लानमध्ये असे कोणतेही बेनिफिट दिले जात नाही. तसेच स्पेक्ट्राच्या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगही मिळत नाही. तर एअरटेल आणि जिओच्या ९९९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लानमध्ये युजर्संना फ्री व्हाइस कॉलिंगचा फायदा मिळतो. स्पेक्ट्रा ब्रॉडबँडची सर्विस देशातील काही निवडक शहरात उपलब्ध आहे. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fSbS3Z

Comments

clue frame