नवी दिल्ली : करोना व्हायरसमुळे सध्या देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य सुविधा देखील वेळेवर उपलब्ध होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत हे. अशा स्तितीत लोकांना मदत करण्यासाठी अनेक टेक कंपन्या आणि स्टार्ट अप्सने हात पुढे केला आहे. या अंतर्गत अनेक अॅप्स तयार करण्यात आले असून, याद्वारे सहज ऑक्सिजन लेव्हल, हार्ट आणि पल्स रेट तपासता येतो. वाचा : या लेखात अशाच अॅप्सबद्दल जाणून घेऊया जे ब्लड ऑक्सिजन लेव्हल आणि हार्ट रेट मोजण्यास उपयोगी आहेत. गुगल प्ले स्टोर आणि अॅपल अॅप स्टोरवरून हे अॅप्स मोफत डाउनलोड करता येईल. मात्र, लक्षात ठेवा की या अॅप्सचा वापर वैद्यकीय दृष्टीने करणे योग्य नाही. जर तुम्हाला कोविड-१९ ची लक्षण दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. MFine app: हे एक इंटिग्रेटेड चेकर आहे. यात फोनच्या कॅमेरा आणि फ्लॅशलाइटचा वापर केला जातो. यावरून यूजर्स डॉक्टर्सकडून सल्ला घेऊ शकतात व होम लॅब टेस्टवर ५० टक्के सूट देखील मिळेल. अॅपला गुगल प्ले स्टोरवरून मोफत डाउनलोड करता येईल. Careplix Vitals app: या अॅपला कोलकत्ताचे स्टार्टअप CareNow Healthcare ने डिझाइन केले आहे. हे अॅप हार्ट रेट, SpO2 आणि रेस्पिरेशन रेट मोजण्यास मदत करते. अॅप SpO2 मोजण्यासाठी फोनच्या फ्लॅशलाइटचा वापर करते. अॅप iOS प्लेटफॉर्मवर उपलब्ध आहे. वाचा : My Vital View app: हे अॅप SpO2 आणि पल्स रेटिंग मोजण्यास मदत करते. अॅपमध्ये ग्लुकोज, ब्लड प्रेशर मॉनिटर आणि ईयर थर्मामीटरचा समावेश आहे. अॅपला गुगल प्ले स्टोर आणि अॅपल अॅप स्टोरवरून डाउनलोड करता येईल. app: हे अॅपल अॅप स्टोवर उपलब्ध आहे. हे एक ब्लड ऑक्सिजन आणि हार्ट रेट मॉनिटर आहे. यूजर्स स्टार्ट आणि स्टॉप बटनद्वारे ब्रिदिंग पॅटर्न उपलब्ध होते. app: हे अॅप ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि हार्ट रेटला ट्रॅक करण्यास मदत करते. यात रियल-टाइम पल्स ग्राफ देण्यात आला आहे. हे अॅप Samsung डिवाइसमध्ये बिल्ट-इन सेंसर्ससोबत काम करते. वाचा : वाचा : वाचा :
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wDZtr9
Comments
Post a Comment