एकावर एक फ्री! जिओच्या एका रिचार्ज प्लानवर मिळत आहे दुसरा मोफत

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने काही दिवसांपूर्वी कोरोना संकटात ग्राहकांना मदत व्हावी यासाठी मोठी घोषणा केली होती. कंपनीने युजर्सला एका रिचार्ज प्लानवर दुसरा मोफत देणार असल्याचे म्हटले होते. म्हणजेच ग्राहकांनी १५५ रुपयांचा रिचार्ज केल्यास, त्याच किंमतीचा दुसरा प्लान मोफत मिळेल. कंपनीचे एकूण ६ प्लान आहेत, ज्यावर ग्राहक नवीन ऑफरचा लाभ घेऊ शकतात. वाचाः १८५ रुपयांचा प्लान या प्लानची वैधता २८ दिवस असून, यात दररोज २ जीबी यानुसार एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. तसेच, डेटा समाप्त झाल्यानंतर ६४ Kbps ने इंटरनेट वापरता येईल. प्लानमध्ये अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाउंड सारख्या अ‍ॅप्सचे मोफत स्बस्क्रिप्शन मिळेल. १५५ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज १ जीबी डेटा मिळेल. तसेच, अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. जिओ अ‍ॅप्सचे मोफत स्बस्क्रिप्शन मिळेल. वाचाः १२५ रुपयांचा प्लान जिओच्या १२५ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवस आहे. यात ग्राहकांना दररोज ०.५ जीबी डेटा असा एकूण १४ जीबी डेटा मिळेल. यात एकूण ३०० एसएमएस आणि अनलिमिटेड वॉयस कॉलिंग मिळते. डेटा समाप्त झाल्यानंतर ६४ Kbps ने इंटरनेट वापरता येईल. ७५ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी एकूण ३ जीबी डेटा मिळतो. तसेच यात अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि ५० एसएमएसची सुविधा मिळेल. यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाउंड सारख्या अ‍ॅप्सचे मोफत स्बस्क्रिप्शन मिळेल. वाचाः ६९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानचा कालावधी १४ दिवस आहे. या प्लानमध्ये एखूण ७ जीबी डेटा मिळतो. म्हणजे दररोज ०.५ जीबी डेटा मिळेल. प्लानमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि जिओ अ‍ॅप्सचे स्बस्क्रिप्शन मिळेल. डेटा समाप्त झाल्यानंतर ६४ Kbps ने इंटरनेट वापरता येईल. ३९ रुपयांचा प्लान जिओच्या ३९ रुपयांच्या प्लानची वैधता १४ दिवस आहे. यात दररोज १०० एमडी डेटा मिळते. ग्राहकांना एकूण १४०० एमबी डेटा मिळेल. वॉइस कॉलिंगची सुविधा अनलिमिटेड आहे. यात जिओ अ‍ॅप्सचे मोफत स्बस्क्रिप्शन मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uzY5Ey

Comments

clue frame