नवी दिल्लीः भारतीय इलेक्ट्रॉनिक बाजारात एकापेक्षा एक स्वस्त स्मार्टफोन उपलब्ध आहेत. या फोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. याशिवाय, या फोनमध्ये एचडी डिस्प्ले सोबत क्वॉड कॅमेरा सेटअप मिळतो. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तसेच तुमचे बजेट कमी असेल तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील फोनसंबंधी खास माहिती देत आहोत. ज्यात एकूण पाच कॅमेरे आणि 6000mAh ची बॅटरी आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः Tecno Spark Power 2 Air स्मार्टफोनध्ये 6000mAh ची बॅटरी आणि क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात पहिला १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, दुसरा २ मेगापिक्सलचा बोकेह लेन्स, तिसरा २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि चौथा एआय लेन्स आहे. तर याच्या फ्रंट मध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. अन्य फीचर्स मध्ये कंपनी या फोनमध्ये ७ इंचाचा डिस्प्ले आणि हीलियो ए २२ प्रोसेसर दिले आहे. या फोनची किंमत ८ हजार ४९९ रुपये आहे. वाचाः कंपनीने या स्मार्टफोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, लेन्स, २ मेगापिक्सलचा मोनोक्रोम लेन्स आणि २ मेगापिक्सलचा लेन्स दिला आहे. या फोनच्या फ्रंट मध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. अन्य फीचर्स मध्ये युजर्संना या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये MediaTech Helio G35 प्रोसेसर मिळणार आहे. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः Moto G10 Power Moto G10 Power स्मार्टफोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. यात पहिला कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, दुसरा ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, तिसरा २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि चौथा २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. तर सेल्फीसाठी या फोनमध्ये फ्रंटमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. याशिवाय, डिव्हाइस मध्ये युजर्संना क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ४६० प्रोसेसर, ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज आणि ६.५ इंचाचा एचडी प्लस मॅक्स व्हीजन डिस्प्ले मिळणार आहे. या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2R77y8J
Comments
Post a Comment