सॅमसंग, शाओमी, रियलमी, पोकोचे हे बजेटमधील स्मार्टफोन; ४८ मेगापिक्सल कॅमेरा आणि 6000mah ची बॅटरी

नवी दिल्लीः स्मार्टफोन मार्केटमध्ये स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. कंपन्या कमी किंमतीत बेस्ट फीचर्स ऑफर करीत आहेत. युजर्संना सुद्धा असे स्मार्टफोन पसंत पडत आहेत. जे बजेट सेगमेंट मध्ये जबरदस्त फीचर्स सोबत येतात. स्मार्टफोन खरेदी करणारा ग्राहक फोनमध्ये सर्वात आधी फोनचा कॅमेरा आणि बॅटरी पाहतो. जाणून घ्या बजेट स्मार्टफोन. ज्यात 48MP चे प्रायमरी कॅमेरा सोबत 6000mAh ची बॅटरी मिळते. वाचाः सॅमसंग गॅलेक्सी F12 ४ जीबी रॅम आणि ६४ जीबीच्या इंटरनल स्टोरेजच्या या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. फोनमध्ये 720x1600 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. 90Hz च्या रिफ्रेश रेट च्या या फोनमध्ये रियर मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ५ मेगापिक्सलचा आणि दोन २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे. फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 6000mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः शाओमी रेडमी ९ पॉवर या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन ४ जीबी रॅम प्लस स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर सोबत येतो. फोनमध्ये ६.५३ इंचाचा IPS LCD स्क्रीन दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये बॅक पॅनेलला चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा आणि दोन मेगापिक्सलचा लेन्स दिला आहे. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः रियलमी नार्जो ३० प्रो हा फोन १५ हजार ४९९ रुपयांच्या किंमतीत येतो. ६ जीबी रॅम आणि मीडियाटेक डायमेंसिटी 800U चिपसेट दिले आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात एलईडी फ्लॅश सोबत तुम्हाला ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, एक ८ मेगापिक्सलचा एक २ मेगापिक्लचा कॅमेरा मिळतो. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः पोको M3 बजेट सेगमेंट मध्ये येणारा हा एक दमदार स्मार्टफोन आहे. ६ जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर दिला आहे. या फोनची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. फोनमध्ये 60Hz चा रिफ्रेश रेट सोबत ६.५३ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. कॅमेरा फीचर्स मध्ये यात एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत दोन मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. ८ मेगापिक्सलचा सेल्फी सोबत येणाऱ्या या फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 6000mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3i00sOv

Comments

clue frame