नवी दिल्लीः भारतात सध्या करोना व्हायरसची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे देशातील अनेक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलिंडर्सची कमतरता भासू लागली आहे. देशातील अनेक जण मदतीसाठी पुढे येत आहे. चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी शाओमी इंडिया सुद्धा अशा परिस्थितीत मदतीसाठी पुढे आली आहे. वाचाः शाओमीने आज एक घोषणा केली आहे. देशातील मेडिकल ऑक्सिजनची कमतरता पाहून कंपनी ३ कोटी रुपये किंमतीचे १ हजार ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स देणगी म्हणून देणार आहे. कोविड - १९ च्या दुसऱ्या लाटेत मेडिकल ऑक्सिजनची मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे देशात सर्वात जास्त याची डिमांड वाढली आहे. दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक सह अन्य काही राज्यात हे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स उपलब्ध करण्यात येणार आहेत. कंपनीने गेल्या वर्षी मार्च महिन्यात करोनाला रोखण्यासाठी भारतात १५ कोटी रुपयांचे डोनेट करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी भारतात करोनाची सुरुवात होती. परंतु, आता देशातील परिस्थिती बिकट झाली आहे. वाचाः शाओमी इंडियाचे हेड आणि कंपनीचे ग्लोबल व्हाइस प्रेसिडेंट मनु कुमार जैन यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, कंपनी GiveIndia टीम सोबत १ कोटी रुपये जमा करण्यासाठी पार्टनरशीप करीत आहे. गिव्ह इंडियासोबत मिळून एक कोटी रुपये जोडले जातील. हे पैसे करोना वॉरियर्सना दिले जाणार आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32FId7Y
Comments
Post a Comment