नवी दिल्लीः विवोच्या नवीन ५जी स्मार्टफोन च्या लाँचिंगची तारीख कन्फर्म करण्यात आली आहे. Vivo V21 5G ची लाँचिंग भारतात २९ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. याआधी कंपनीने लाँचिंग संबंधी सांगितले होते, परंतु, तारीख जाहीर केली नव्हती. आता मात्र, कंपनीने या फोनची तारीख जाहीर केली आहे. तसेच फ्लिपकार्टवर एक पेज लाइव्ह करण्यात आले आहे. यावरून फोनच्या फीचर्स संबंधी माहिती मिळत आहे. वाचाः Vivo V21 5G ला भारतात २९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता लाँच करण्यात येणार आहे. या फोनमध्ये ४४ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. यासोबतच ऑप्टिकल इमेज स्टेबलायजेशन सुद्धा मिळणार आहे. डिस्प्लेत वॉटर ड्रॉप नॉच दिले जाणार आहे. फोनच्या किंमतीसंदर्भात अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध करण्यात आले नाही. परंतु, असे मानले जात आहे की, याची किंमत २२ हजार ९९० रुपये असू शकते. कारण, Vivo V21 5G च्या टक्कर मध्ये बाजारात २५ हजार रुपये किंमतीचे अनेक ५जी स्मार्टफोन उपलब्ध आहेत. वाचाः विवोने याआधीही आपल्या अनेक स्मार्टफोनमध्ये ऑटो फोकस दिला आहे. जो सब्जेक्ट सोबत मूव्ह केला जाऊ शकतो. सब्जेक्टवर फोकस केल्यानंतर त्रास होत नाही. विवो व्ही २० प्रो मध्ये सुद्धा ४४ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला होता. त्यात ड्युअल लेन्स आणि विवो व्ही २१ मध्ये सिंगल लेन्स मिळणार आहे. विवो व्ही २१ मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स मिळणार आहे. यासोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सपोर्ट मिळणार आहे. अन्य दोन लेन्स संबंधी सध्या कोणतीही माहिती समोर आली नाही. फोनमध्ये अँड्रॉयड ११ वर आधारित फनटच ओएस ११ मिळणार आहे. फोनमध्ये ८ जीबी पर्यंत रॅम आणि कमीत कमी १२८ जीबी पर्यंत स्टोरेज मिळणार आहे. फोनमध्ये ५ जी सपोर्ट मिळणार आहे. फोनच्या वनिला मॉडलला नुकतेच बीआयएसच्या वेबसाइटवर पाहिले गेले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tN19h7
Comments
Post a Comment