नवी दिल्लीः सोनी इंडिया (Sony India) ने एक नवीन 4K LED अँड्रॉयड टीव्ही Bravia X75 सीरीज ला लाँच करीत असल्याची घोषणा केली आहे. या नवीन Sony Bravia X75 सीरीज एक 4K रिज़ॉल्यूशन स्क्रीन सोबत आणली आहे. यी टीव्हीला साइज मध्ये मार्केटमध्ये बाजारात उतरवले आहे. हे दोन टीव्ही ४३ इंच आणि ५० इंचाच्या साइज मध्ये आणले आहे. या टीव्ही सोनीच्या ४के अँड्रॉयड टीव्हीचे मिड एन्ट्री सेगमेंटचे टीव्ही आहे. कारण, सोनी सर्वसाधारण जरा महाग किंमतीचे टीव्ही लाँच करतात. या स्मार्ट टीव्हीत Sony X1 4K HDR प्रोसेसर दिले आहेत. या टीव्हीचा पहिला सेल भारतात २१ एप्रिल पासून सुरू करण्यात येणार आहे. वाचाः Sony Bravia X75 टीव्हीची किंमत Sony Bravia X75 सीरीजच्या ४३ इंचाच्या टीव्हीची किंमत ६६ हजार ९९० रुपयांपासून सुरू होते. तर ५० इंचाच्या व्हेरियंटची किंमत ८४ हजार ९०० रुपये आहे. लाँच ऑफर अंतर्गत कंपनी सध्या या टीव्हीला ५९ हजार ९९० रुपये आणि ७२ हजार ९९० रुपयांत उपलब्ध करण्यात आले आहे. वाचाः Sony Bravia X75 TV चे फीचर्स Sony Bravia X75 च्या दोन्ही टीव्ही अल्ट्रा एचडीआर स्क्रीन सोबत येते. याचा रिझॉल्यूशन 3840x2160 पिक्सल आहे. हाय डायनामिक रेंज कॉन्टेंट साठी टीव्हीत एचडीआर १० आणि एचएलजी फॉर्मेट सपोर्ट दिले आहे. यासोबत साउंड प्रोसेसिंगसाठी डॉल्बी ऑडियो दिले आहे. ही टीव्ही Sony X1 4K HDR प्रोसेसर वर काम करते. यात गुगल प्ले स्टोरचे अॅक्सेस दिले आहे. या टीव्हीत प्रमुख स्ट्रीमिंग सर्विस जसे, Netflix, Amazon Prime Video, YouTube, Disney+ Hotstar आदी दिले आहेत. या टीव्हीत बिल्ट इन क्रोमकास्ट आणि गुगल असिस्टेंट अॅक्सेस दिले आहे. या टीव्हीत तीन HDMI पोर्ट्स आणि दोन USB पोर्ट्स दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QdZv9U
Comments
Post a Comment