SBI चा अलर्ट: असा QR code शेयर केल्यास अकाउंट होणार रिकामे, बँकेने ट्विट करून केले सावध

नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकने आपल्या खातेदारांना एक ट्विट करून अलर्ट केले आहे. एसबीआयने आपल्या ट्विट मध्ये ग्राहकांना सावध राहण्याची सूचना केली असून दुसरीकडून पाठवण्यात आलेला QR कोडला स्कॅन करू नका, असा सल्ला दिला आहे. जर तुम्ही असे केले तर तुमचे अकाउंट रिकामे होऊ शकते. करोना काळात अनेक जण ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करीत आहेत. त्यामुळे ऑनलाइन फ्रॉडच्या तक्रारी वाढत आहेत. ऑनलाइन बँकिंगचा कोणत्याही धोक्याविना वापर करण्यासाठी बँकेने एक अलर्ट जारी केले आहे. अशा मेसेजपासून सावध राहण्याची सूचना बँकेकडून करण्यात आली आहे. वाचाः अशा QR Code पासून सावध राहा स्टेट बँक ऑफ इंडियाने या प्रकारच्या फ्रॉडपासून दूर राहण्यासाठी एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओत ग्राहकांना सांगितले गेले आहे की, ऑनलाइन ठग ग्राहकांना डायनिंग टेबलच्या पेमेंटसाठी QR कोड पाठवतो. परंतु, ग्राहकांनी हे लक्षात ठेवावे की, QR कोड नेहमी पेमेंट करण्यासाठी वापरला जातो. पेमेंट रिसिव करण्यासाठी नाही. त्यामुळे या रिक्वेस्टला नाही मानत. त्यामुळे सावध व्हा. QR Code च्या फ्रॉडपासून सावध राहण्याची सूचना बँकेकडून करण्यात आली आहे. वाचाः असे करा पेमेंट एसबीआय वेळोवेळी आपल्या ग्राहकांना फ्रॉडपासून सुरक्षित राहण्यासाठी अलर्ट जारी करीत असतो. याआधी बँकेने डेबिट कार्ड वरून होत असलेल्या फ्रॉडवरून ग्राहकांना सूचित केले होते. जर QR कोड वरून पेमेंट करायचे असेल तर योनो अॅपचा वापर करा. हे पूर्णपणे सुरक्षित आहे. तसेच खूपच सोपे सुद्धा आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3evb2cI

Comments

clue frame