Redmi Note 10 प्रो खरेदी करण्याची आकर्षक संधी, पाहा किंमत-ऑफर्स

नवी दिल्ली चीनची स्मार्टफोन कंपनी झिओमी ने रेडमी नोट 10 प्रो हा स्मार्टफोन लॉन्च केला केल्यापासूनच हा फोन यूजर्समध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. तुम्ही या मस्त फोनला खरेदी करायची संधी यापूर्वी गमावली असेल तर काळजी करू नका. कारण, आज हा विशेष सेल ग्राहकांकरिता उपलब्ध होणार आहे. Amazon India वर दुपारी १२ वाजता या सेलला सुरुवात झाली. हा फोन ई-कॉमर्स वेबसाइट Amazon या फोनची किंमत १५,९९९ पासून चालू आहे. वाचाः रेडमी नोट १० प्रो किंमती आणि ऑफरः हा फोन तीन व्हॅरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ही व्हॅरिएंट ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह उपलब्ध आहे. याची किंमत १५,९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १६,९९९ रुपये आहे. तिसरा व्हॅरिएंट ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटचा दर १८,९९९ रुपये आहे. वाचाः डार्क नाइट, ग्लेशियल ब्लू आणि विंटेज ब्रॉन्ज कलर सारख्या रंगांचे पर्याय यात उपलब्ध आहे. नो कॉस्टवर ईएमआय आहे.ऑफर्सविषयी बोलायचे झाले तर नो कॉस्ट ईएमआय ८०० रुपयांपासून सुरु आहे. तर काही निवडक कार्ड्स वर नो कॉस्ट ईएमआय चा पर्यायही देणार आला आहे. रेडमी नोट १० प्रो फीचर्स: यात ६.६ इंच सुपर एमोलेड एफएचडीसह डिस्प्लेसह आहे. रिफ्रेश रेट १२० Hz आहे. अस्पेकट रेशिओ २० :९ आहे. फोन एचडीआर 10 ला सपोर्ट करतो. पिक्सल रेजोल्यूशन १०८०x२४०० असून फोन एमआययूआय १२ वर आधारित अँड्रॉइड ११ वर काम करतो. हा फोन 2.3 गीगा क्‍लॉक स्पीडसह ८ एनएम प्रोसेससह लस अक्‍टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३२ जी प्रोसेसरसह आहे. ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२8 जीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्ड्सच्या मदतीने वाढविता येईल. तर, ग्राफिक्ससाठी रेनड्रेनो ६१८ जीपीयू देखील दिले गेले आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी रेडमी नोट १० प्रो मध्ये एलईडी फ्लॅशसह क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिले आहे. प्रायमरी सेन्सर मध्ये ६४ मेगापिक्सल आहे. दुसरा लेन्स ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेंस आहे. तर तिसरा ५ मेगापिक्सल टेलीमाइक्रो आणि चौथा २ मेगापिक्सल का डेप्थ सेन्सर. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सल का फ्रंट सेन्सर आहे. ५०२० एमएएच बॅटरीसाठी ३३ डब्ल्यू फास्ट चार्जर सपोर्ट आहे. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tCCGLf

Comments

clue frame