नवी दिल्लीः स्मार्टफोन निर्माता रियलमीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर रीअलमी डेज सेलचे आयोजन केले आहे. यात कंपनी आपल्या बर्याच स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि इतर काही ऍक्सेसरीजवर मोठ्या प्रमाणत आणि ऑफर देत आहे. हा सेल आजपासून २१ एप्रिलपासून सुरू होईल आणि २४ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला या सेलमध्ये काय काय खरेदी करायचे आहे त्याची यादी तयार करून ठेवा. वाचाः स्मार्टफोन आणि उत्पादनांवरील सूट व्यतिरिक्त, रियलमी अनेक ऑफर देखील देत आहे. फ्री चार्जद्वारे ७५ रुपये आणि मोबिक्विकद्वारे १० टक्के कॅशबॅक फ्लॅट कॅशबॅक देण्यात येईल. हे जास्तीत जास्त २०० रुपये असेल. रिअलमी डेज सेलमध्ये उपलब्ध असलेल्या या ऑफरबद्दल जाणून घ्या. कोणत्या प्रोडक्टवर किती सूट उपलब्ध आहे त्याबद्धल रियलमी एक्स ७ ला १०००रुपये इतका कॅशबॅक देण्यात येत आहे. ऑफर मिळाल्यांनतर हा फोन तुम्हाला १९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तसेच रियलमी एक्स ७ प्रो सह२ हजार रुपयांची प्रीपेड कॅशबॅक ऑफर देण्यात येत आहे, या ऑफेरसह फोन २७,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. वाचाः रियलमी नार्जो ३० प्रो वर १००० रुपयांची कॅशबॅक ऑफर देण्यात येत आहे, त्यानंतर ती १५,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. रिअलमी स्मार्ट टीव्ही एसएलईडी ४ के हा ५५ इंचाचा स्मार्ट टीव्ही,ज्याची याची किंमत ४३,९९९ रुपये आहे . तो ऑफर अंतर्गत ४०,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा डॉल्बी ऑडिओ ध्वनीसह येतो. रियलमीच्या रियल डेज सेलमध्ये रियलमी सी १५ क्वालकॉम एडिशन एक हजार रुपयांच्या कॅशबॅकसह खरेदी करता येईल. या ऑफरसह ८,९९९ रुपये तुम्हाला द्यावे लागतील. तर , रियलमी ७ आय बद्दल बोलायचे झाले तर ते १३,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हे हेलिओ जी ९५ चिपसेटसह असून यात 90Hz एलसीडी डिस्प्ले देखील आहे. Realme 7 Pro १७,९९९रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यात ६४ मेगापिक्सलचा सोनी कॅमेरा, ६५ डब्ल्यू फास्ट चार्जिंग आणि एएमओएलईडी डिस्प्ले आहे. रियलमी नरझो २ प्रो १२, ९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हे ६५ डब्ल्यू फास्ट चार्जिंग आणि ४८ मेगापिक्सल जलद कॅमेरासह आहे. Realme 6 Pro १७,९९९ रुपयांमध्ये तर Realme X3 मालिका २१,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर खरेदी करता येईल. वाचाः जाणून घ्या या ऑफर्सविषयी रिअलमी नार्जो ३० ए ५०० सूट मिळवून ८,४५० रुपयात खरेदी करता येईल. याची वास्तविक किंमत८,९९९ रुपये आहे. तर रिअलमी एक्स ५० प्रो जी मोठ्या सवलतीत खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे . याची किंमत ४१,९९९ रुपये आहे. तब्बल १०००० रुपयांच्या सवलतीत म्हणजे ३१,९९९ रुपयात त खरेदी करता येणार आहे. रिअलमी एक्स ३ सुपरझूम ३२,९९९ रुपयांऐवजी २७,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यावर पाच हजार रुपयांची सूट देण्यात येत आहे. वाचाः अॅक्सेसरीजवरही सूटः रियलमी बड्स वायरलेस प्रो ३,९९९ रुपयांऐवजी ३,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येतील. रियलमी बड्स वायरलेस १,७९९ रुपयांऐवजी १,५९९ रुपयांमध्ये मिळेल . रियलमी बड्स एयर निओ २,९९९ रुपयांऐवजी २,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. realme Buds Q १,९९९ रुपयांऐवजी १,५९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. रियलमी स्मार्ट घड्याळ ३,९९९ रुपयांऐवजी ३,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. रिअलमी ३० डब्ल्यू डार्ट चार्ज १०००० mAh पॉवर बँक १,९९९ रुपयांऐवजी १,७९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sCJ0kS
Comments
Post a Comment