PayTm ची मोठी घोषणा, भारताला ३ हजार ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर देणार

नवी दिल्लीः आर्थिक सेवा देणारी कंपनी पेटीएमने सोमवारी एक मोठी घोषणा केली आहे. पेटीएम फाउंडेशन ३ हजार ऑक्सिजन कन्सट्रेटर आयात करणार आहे. कोविड-१९ महामारी दर्याने देशात करोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची कमी दूर करण्यासाठी याची मोठी मदत मिळणार आहे. कंपनीने भारतासाठी ऑक्सिजन (ऑक्सिजन फॉर इंडिया) नावाने एक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेतून जनजागृती करण्याचे काम केले जाणार आहे. वाचाः पेटीएमने सोमवारी म्हटले की, पेटीएम फाउंडेशनने १ हजार ऑक्सिजन कन्सन्ट्रेटरच्या आयात साठी ऑर्डर केले आहेत. याची बाजारात ४ कोटी किंमत आहे. कंपनीने लोकांकडून दहा कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पेटीएम फाउंडेशने ३ हजार ऑक्सिजन कन्सट्रेटर आयात करण्याची योजना बनवली आहे. यांना हॉस्पिटल क्लिनिक आणि रेजिडेंट वेलफेयर असोसिएशनला दिले जाणार आहे. पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शंकर शर्मा यांनी म्हटले की, मी अन्य स्टार्टअप कंपन्यांना आवाहन करतो की, त्यांनी या मोहिमेत सहभाग घेऊन मदत करावी. आमच्या एक रुपयांच्या मदतीत त्यांनी एक रुपया मिळावा. म्हणजेच ऑक्सिजन कन्सट्रेटरची संख्या दुप्पट होईल. वाचाः गुगल आणि मायक्रोसॉफ्ट कंपन्यांकडून मदतीचा हात भारतात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सोमवारी ट्विट करून भारताला १३५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. हे पैसे GiveIndia आणि UNICEF ला दिले जाणार आहेत. याच्या मदतीने सर्व पीडितपर्यंत कॅश आणि मेडिकल सप्लाय केले जाणार आहेत. ज्यात ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर आदीचा समावेश आहे. वाचाः याशिवाय, मायक्रोसॉफ्टचे सीईओ ने सुद्धा ट्विट करून भारताला सर्व प्रकारची मदत करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिले की, भारताची सध्याची स्थिती पाहून मी खूप दुःखी आहे. अमेरिका सरकार मदतीसाठी पुढे आल्याने त्यांचे आभार मानतो. मायक्रोसॉफ्ट कंपनी भारताला ऑक्सिजन कन्सन्ट्रेशन डिव्हाइस खरेदी करण्यासाठी मदत करणार आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QCMx5s

Comments

clue frame