देशातील सर्वात स्वस्त ५जी फोन Oppo A53s 5G भारतात लाँच, पाहा फीचर्स-किंमत

नवी दिल्लीः Oppo A53s 5G: हँडसेट निर्माता कंपनी ओप्पो ने भारतीय ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त ५जी स्मार्टफोनला लाँच केले आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. हा फोन भारतात नुकताच लाँच झालेल्या Realme 8 5G ला टक्कर देणार आहे. या फोनची सुरुवातीची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. जाणून घ्या फोनसंबंधी. वाचाः या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. कंपनीच्या माहितीनुसार, फोन अँड्रॉयड Android 11 वर आधारित ColorOS 11.1 वर काम करतो. स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी MediaTek Dimensity 700 SoC सोबत ग्राफिक्ससाठी माली जी57 MC2 जीपीयूचा वापर केला आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. वाचाः फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत. १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, सोबत २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000 mAh ची बॅटरी दिली आहे. यात १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. भारतात या लेटेस्ट ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत १४ हजार ९९० रुपये तर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९० रुपये आहे. वाचाः ओप्पोच्या या फोनची किंमत २ मे रोजी दुपारी १२ वाजता एक्सक्लूसिव्ह म्हणून ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. ग्राहकांनी जर एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वरुन पेमेंट केल्या १२५० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकणार आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vpmvBM

Comments

clue frame