नवी दिल्ली : Oppoने नुकताच नवीन स्मार्टफोन ए 74 5 जी भारतात लॉन्च केला आहे. या फोनची किंमत १७,९९० रुपये आहे. आता कंपनी ओप्पो ए ५३ हा नवीन बजेट स्मार्टफोन भारतात आणण्याची तयारी करत असून हा ५ जी फोन कंपनी २७ एप्रिलला लाँच करणार आहे. विशेष म्हणजे त्याची किंमत १५ हजार रुपयांपेक्षा कमी असेल. तसेच हा फोन मीडियाटेक डायमेन्शन ७०० एसओसी प्रोसेसरसह येईल असेही कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. फोनच्या टीझर इमेज वरून सांगायचे झाले तर फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि साइड-माऊंट फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे . फोनचे डिझाईन चीनमध्ये नुकत्याच लाँच झालेल्या ओप्पो ए ५५ असू शकत. भारतात या फोनचा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट असेल. फोनची किंमत आणि उपलब्धता जाणून घेण्यासाठी मात्र तुम्हाला लॉन्चची प्रतीक्षा करावी लागेल. वाचा : oppoA53s 5G फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स फोनमध्ये १६००x७२० पिक्सल रिझोल्यूशनसह ६.५ इंचाचा एचडी + डिस्प्ले आहे. प्रोसेसरबाबत कंपनीने यापूर्वीच सांगितले आहे की त्यात मीडियाटेक डायमेन्शन ७०० चिपसेट देण्यात येईल. कंपनी हा फोन ४ जीबी आणि ६ जीबी रॅम ऑप्शनमध्ये लॉन्च करू शकते. फोनची अंतर्गत मेमरी १२८ जीबी असेल जी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने १TB पर्यंत वाढविली जाऊ शकते. फोटोग्राफीसाठी या फोनला एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात येऊ शकतो . यात १३ मेगापिक्सेल प्रायमरी लेन्स व २-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्ससह २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असू शकतो. सेल्फीसाठी तुम्हाला या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकेल. ओएसबद्दल बोलायचे झाल्यास फोन कंपनीच्या स्वत: च्या कलर ओएस ११.१ वर Android ११ आउट-ऑफ-बॉक्सवर आधारित काम करेल . फोनला अधिक ' पावर' देण्यासाठी, वेगवान चार्जिंग तंत्रज्ञानासह ५००० mah बॅटरी मिळू शकते वाचा :
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tQlylq
Comments
Post a Comment